स्व.सौ.सुशिलादेवी रतनचंद दोशी यांच्या पुण्यस्मरणार्थ “रत्नत्रय” गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

स्व.सौ.सुशिलादेवी रतनचंद दोशी यांच्या पुण्यस्मरणार्थ “रत्नत्रय” गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/06/2024 :
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व जुनियर कॉलेज, मांडवे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांच्या मातोश्री स्व.सौ. सुशीलादेवी रतनचंद दोशी यांच्या 16व्या पुण्यस्मरणार्थ रत्नत्रय स्कूल मध्ये इयत्ता 10 वी 12 वी व मंथन परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
संग्रामनगर-अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य)येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ.सतीश जंबुकुमार दोशी यांचे हस्ते प्रतिमापूजन झाले. माळेवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रीतम महावीर गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी, सदाशिवनगर चे संस्थापक, अध्यक्ष अनंतलाल दोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडला.
याप्रसंगी अजित दोशी, मार्गदर्शक वीरकुमार दोशी संस्थेचे सचिव प्रमोद दोशी, सनतकुमार दोशी, माजी मुख्याध्यापक कुमार तोरणे, ग्रामसेवक प्रशांत रुपनवर, बबन गोपने, सुरेश धाईंजे, सौ.पार्वती जाधव, मुख्याध्यापक वाघमोडे, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.सतीश दोशी यांनी बोलताना उत्कृष्ट अशा कवितेच्या माध्यमातून आई व आईचे महत्व पटवून, “आजच्या तरुण पिढीने आपल्या आई-वडिलांचा संभाळ कसा करावा हे सांगितले .आणि आणि संस्थेतील तीन रत्ने अनंतलाल, वीरकुमार, प्रमोद यांनी आपल्या बाईंचे स्वप्न सत्यात उतरवून या स्वप्नरुपी वेलीचे रूपांतर हळूहळू वटवृक्षात होतना दिसत आहे” अशा समर्पक शब्दात कौतुक केले.त्यानंतर कुमार तोरणे यांनी “रत्नत्रय परिवाराने रानमाळावर शाळा सुरू करून नंदनवन फुलविले आहे” असे उद्गार काढले.व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, सूत्रसंचालन माधवी रणदिवे व आभार प्रदर्शन वनिता निंबाळकर यांनी मानले.