ताज्या घडामोडी

रो. बबनराव शेंडगे यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

रो.बबनराव शेंडगे यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 29/06/2024 :

अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य.) येथील इंजिनीयर रो. बबनराव शेंडगे यांची रोटरी क्लब नॉर्थ सोलापूर, रोटरी क्लब जुळे सोलापूर व रोटरी क्लब कुर्डवाडी यांच्याकरिता
असिस्टंट गव्हर्नर म्हणून निवड झाल्याबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीमती स्वाती हेरकळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रोटरी वर्ष 2024-25 करिता रोटरी क्लब अकलूज नवीन अध्यक्ष, सचिव व संचालक यांचा पदग्रहण समारंभ कृष्णप्रिया हॉल, अकलूज येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीमती स्वाती हेरकळ या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते रोटरी च्या सायकल बँकेचा, आटा चक्की व महिलांचे शारीरिक आजार तपासणीच्या विशेष करून कॅन्सर सारख्या आजाराच्या तपासणी करता अत्याधुनिक अशा मोबाईल बसचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष सौ. प्रिया नागणे व सचिव मनीष गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी रोटरीचे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळा, चाईल्ड हेल्थ, पर्यावरण, आरोग्य, शांतता, वॉटर सेनेटेशन इत्यादीमध्ये भरीव कार्य करण्यासाठी प्रबोधन केले.

हार्दिक अभिनंदन !!!
“रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण करीत असलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपली असिस्टंट गव्हर्नर पदी निवड झाली याबद्दल एन.यू.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख व प्रसिद्धी प्रमुख या नात्याने मी आपले हार्दिक अभिनंदन करीत भावी कार्यासाठी शुभेच्छा देत आहे” अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (संस्थापक संपादक, साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि aklujvaibhav.in) यांनी नूतन असिस्टंट गव्हर्नर रो. बबनराव शेंडगे यांचे अभिनंदन केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.