ताज्या घडामोडी

विद्यार्थी जडणघडणी मध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची : अनंंतलाल दोशी

विद्यार्थी जडणघडणी मध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची : अनंंतलाल दोशी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28/06/2024 :

“विद्यार्थी जडणघडण करण्यामध्ये पालकाची भूमिका महत्त्वाची असते. पालकांनी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी मूल्यमापन करणे आवश्यक आहे” असे मत रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी व्यक्त केले.
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी, सदाशिवनगर व श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर संस्थान अतिशय क्षेत्र दहिगाव संचलित
विलासचंद्र एम मेहता खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र दहिगाव येथे भव्य रोजगार व पालक मेळाव्याचे अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. दिनांक 26 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रारंभीच मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर व श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
पुढे बोलताना ते म्हणाले व्यावसायिक शिक्षणामुळे उद्योजकतेला चालना मिळते. उद्योगशील विचारांनी परिपूर्ण असलेल्या देशात, व्यावसायिक प्रशिक्षण व्यक्तींना त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्ञान आणि आत्मविश्वासाने सुसज्ज करते.
रोजगार मेळावा घेण्याचा हेतू सांगताना प्राचार्य जगताप सर म्हणाले “भारतातील व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व जास्त सांगण्याची गरज नाही. हे केवळ कौशल्यांमधील अंतर दूर करत नाही तर व्यक्तींना सक्षम बनवते, उद्योजकता वाढवते आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. त्याच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी, देशभरात व्यावसायिक शिक्षणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि त्याला प्राधान्य देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.” या रोजगार मेळाव्या मध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शिकत असणारे व परिसरातील विद्यार्थी सहभागी झाले होते.


सदर प्रसंगी रत्नत्रय अकॅडमीचे चेअरमन रोनक चंकेश्वरा, अमित गांधी, शितल गांधी, सी ए आय टी कंपनी पुण्याचे विकास मोहिते, प्राचार्य गजेश जगताप, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उपस्थित होते. मेळाव्याचे वैशिष्ट असे की सी ए आय टी कंपनी पुण्याचे विकास मोहिते यांनी पात्र तरुणांच्या मुलाखती घेतल्या व लगेच दोन दिवसांमध्येच पात्र प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हांगे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बरडकर,नाळे, खंडागळे, पाटील चव्हाण व शिरतोडे आदींनी परिश्रम घेतले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.