श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि.सदाशिवनगर यांच्यावतीने AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि.सदाशिवनगर यांच्यावतीने AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/04/2025 : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी कारखान्याचे वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 100 दिवसीय कृती आराखड्यानुसार ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ए आय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर यांच्या वतीने करण्यात आले असून
या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते,शिवामृत दूध उत्पादक सह. संघाचे चेअरमन व खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार उत्तमराव शिवदास जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक 19-04-2025 रोजी सकाळी 10 वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते डॉ. विवेक भोईटे (विशेषतज्ञ मृदा शास्त्र विभाग कृषी विज्ञान केंद्र बारामती,विषय: ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI तंत्रज्ञान) वापर),
डॉ. समाधान सुरवसे (शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे, विषय:ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान) हे तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे विनंती वजा आवाहन कारखान्याचे चेअरमन व आमदार रणजितसिंह मोहिते व्हॉइस चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.