विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/04/2025 : शाळेला सुट्टी लागल्यावर काय करायचे याचे बेत ठरलेले असतात. गावी जाणार असलो तर झाडावर चढायला शिकणे, सायकल शिकणे, पोहायला शिकणे असे आपण ठरवतो. हे सर्व यायलाच हवे. ते पण महत्वाचे आहे.
आपल्या बरोबर मोठे लक्ष देणारे कोणी तरी जबाबदार व्यक्ती अशावेळेस आपल्या सोबत हवी. टप्प्याटप्प्याने प्रयत्न केले पाहिजेत. मनात भीती नको. मला शिकायचे आहे, जमेल मला हा विश्वास मनात हवा.
मुलांनो, अगोदर थोड्या पाण्यात प्रयत्न करा, मनातील भीती घालावा मग जास्त पाण्यात जा. अनोळखी ठिकाणी पाण्याचा अंदाज नसतो. अशावेळेस एकदम उडी मारू नका. सायकल पण अशीच आतल्या, कमी गर्दीच्या रस्त्यावर चालवण्याचा प्रयत्न करा. झाडावर चढताना मजबूत फांदी आहे ना याची खात्री करा नाहीतर हात-पाय मोडून घेण्याची वेळ येईल.
सुट्टीचे उद्योग न वाढवता, ती सत्कारणी लावा.
_- सौ. स्नेहलता स. जगताप._