विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/04/2025 : सध्या सर्वत्रच उन्हाने कहर केला आहे. उन्हात जायचे टाळले तरी घरात सुद्धा उकडा असह्य होत आहे. पंखा चालू केला तरी पुरेसे थंड वाटत नाही. गार पाण्याने अंघोळ करावी वाटले तरी नळाचे पाणी गरम येते. माठातील पाण्याने सुद्धा तहान भागत नाही.
यामधील एकही तक्रार न करता आमचे फौजी राजस्थान सारख्या सीमेवर भाजून निघतात. ना सावलीला बसू शकतात ना पंख्याची हवा. फौजी गणवेशात शिजून निघत असतील तरी पाठीवर ओझे व खांद्यावर बंदूक देऊन खडा पहारा देत आहेत, मातृभूमीच्या रक्षणासाठी.
याची जाणीव जर तुम्ही ठेवलीत तर भविष्यात तुमच्याकडून एकही समाज विघातक कृत्य घडणार नाही. फौजी व त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल तुमच्या मनात सदैव आदराची व कृतज्ञतेची भावना राहील व भविष्यात देशरक्षण करण्याचे ध्येय ठेवाल.
आपल्या देशाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे! फौजींचे जीवन हा एक आदर्श आहे.
जयहिंद!🇮🇳
_- सौ. स्नेहलता स. जगताप_