मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/04/2025 : आपल्या जीवनात येणारे सुख किंवा दुःख हे अनेकदा आपणच ओढवून घेतलेले असते. मात्र ते मान्य न करता आपण इतरांना दोष देतो. आपल्या सुखाची जबाबदारी, त्याचे मोठेपण आपण स्वतः घेतो पण दुःख, अपयश या गोष्टींचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडतो.
वास्तविक इथे आपला स्वभाव व आपले वर्तन कारणीभूत असते. योग्य विचार व विचारपूर्वक केलेले वर्तन निश्चितच आनंद देते, सुख देते. याउलट चुकीचा विचार असेल तर आपले निर्णय चुकतात. अविचारी वर्तन आपल्याला दुःखाच्या खाईत लोटते.
आपले विचार, आपल्या कुटुंबीयांचे, मित्र परिवाराचे एका विचाराने घेतलेले निर्णय आपल्याला सामूहिक यश देते. हे सर्व संस्कार व सकारात्मकता यावर अवलंबून असते. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत की संघटित अविचारी माणसे इतरांना त्रासदायक ठरतात. आसपासचे पूर्ण वातावरण दूषित करतात.
आजचा संकल्प
_सद्विचाराने सदाचार करू. परस्पर संबंध सलोख्याचे ठेवू व सर्वत्र आनंदाचे वातावरण असेल, जास्तीतजास्त लोक सुखी होतील असा प्रयत्न करू._
_- सौ. स्नेहलता स. जगताप._