ताज्या घडामोडी

ब्राम्हण अजूनही श्रेष्ठ ? पण, तो आजही फुलेंना का घाबरतो?

ब्राम्हण अजूनही श्रेष्ठ ?
पण, तो आजही फुलेंना का घाबरतो?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/04/2025 :
“ब्राम्हण झाला कितीही भ्रष्ट, तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ” असे रामदास स्वामी म्हणतात. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत ब्राम्हण श्रेष्ठच असल्याचे निदर्शनास येते. कारण, आज लोकसंख्येच्या दृष्टीने ब्राम्हणांची संख्या अवघी 3% टक्के असली, तरी देशातील सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुख तथा विविध विभागांच्या पदांवर यांचेच वर्चस्व दिसून येते. त्यामुळे कमी लोकसंख्या असली तरी यांनी हरकत घेतलेल्या मुद्द्यांवर तात्काळ अँक्शन घेतली जाते. निमित्त आहे महात्मा फुलेंचा चित्रपट. ब्राम्हण महासंघाने खुलेआम या चित्रपटावर हरकत घेऊन सेंसॉर बोर्डाकडे तक्रार नोंदविली आहे. त्याची तात्काळ दखल घेऊन काही दृष्यांवर कात्री फिरवायला सांगितली. त्यामुळे महात्मा फुलेंच्या जयंती दिनी प्रदर्शित होणारा हा चित्रपट सध्या प्रतिक्षेत आहे.
ब्राम्हण शक्यतो खुलेआम कधीच कृती करीत नाही. मात्र ब्राम्हण महासंघाने फुलेंच्या चित्रपटाला विरोध दर्शवून त्यांनी लोकांचे लक्ष फुलेंवर केंद्रीत केले. त्याकाळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई या फुले दांपत्यांनी समाजसुधारण्याचे काम हाती घेतले होते. महिलांच्या चूल आणि मूल या संकल्पनेला बगल देत पहिली मुलींची शाळा सुरु केली होती. हे धर्माच्या विरोधात काम आहे असे समजून ब्राम्हणांनी त्यांच्यावर शेण, चिखल, खरकटे पाणी आणि दगडाचा मारा केला होता. हा इतिहास आणि ही वस्तूस्थिती आम्हाला शाळेत लहानपणीच पुस्तकात शिकवली गेली आहे. मग चित्रपटात हे दृष्य दाखविले गेले तर त्यात गैर काय? हा सिनेमा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, फक्त आणि फक्त सत्य घटनेवर आधारित आहे. त्याकाळी जे घडले ते दाखविले. त्यात समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच कुठे येतो? आणि बघताना एवढे वाईट वाटत असेल, तर आपले पुर्वज किती ×× व ×××× होते हे समजून घेण्यात काय हरकत आहे? तसेच फुलेंच्या जीवनावर आधारित हजारो पुस्तके, वाडःमय आहेत, त्यात याच वस्तूस्थितीचा उल्लेख आहेच.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी या भूमीत जन्म घेऊन इतिहास घडविला. ते मानव होते हे शाश्वत आहे काल्पनिक नाही हे आधी लक्षात घेतले पाहिजे. त्याकाळी चातुर्वर्ण्य पध्दत अस्तित्वात होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण होते. आत्ताच्या हिंदू म्हणवून घेणाऱ्या साळी, माळी, कोळी, तांबोळी, कुणबी, आगरी वगैरे वगैरे अंदाजे 6300 जातीच्या लोकांनी आपण कोणत्या वर्णात बसत होतो याचा आधी विचार करावा? फुलेंच्या चित्रपटाला विरोध का आणि कशासाठी करायचा? फुलेंना त्याकाळीही त्रास दिला आणि आजही दिला जात आहे हे दुर्दैवी आहे. फुलेंना इतके घाबरण्याचे कारणच काय? ‘काश्मिर स्टोरी’ आणि सध्याचा ‘छावा’ चित्रपटानंतर सामाजीक वातावरण बिघडल्याचे पहायला मिळाले. बहुधा हिच भिती ब्राम्हण समाजाच्या मनात तर नसेल ना? त्याकाळची ही वस्तूस्थिती पाहून आत्ताचा बहुजन समाज जो स्वतःला हिंदू म्हणवून घेत आहे, तो जर जागा झाला तर? त्यांनी बगावतचा झेंडा हाती घेतला तर देशात क्रांती घडेल, म्हणून फुले चित्रपटाच्या माध्यमातून हा खरा इतिहास जगासमोर येऊ नये म्हणून त्याला एका समाजाकडून तिव्र विरोध होऊ लागला आहे. मात्र जसा 3% टक्केवाला समाज विरोध करतो आहे तसा 97% टक्केवाला समाज समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेला दिसत नाही. अजूनही तो पूर्वीसारखा झोपेतच आहे. हि बहुजनांसाठी धोक्याची घंटा आहे.

✍️ महेंद्र कुंभारे
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी
सोमवार दि, 14 एप्रिल 2025
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
मो.नं. 8888182324

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button