कौन बनेगा करोडपती अर्थात तुम्हाला करोडपती व्हायचे आहे काय?
कौन बनेगा करोडपती अर्थात
तुम्हाला करोडपती व्हायचे आहे काय?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/04/2025 :
आपल्या देशात विचार स्वातंत्र्याचा फार मोठा उदो उदो चालला आहे प्रत्येक जण आपल्या मनाला येईल ते बकतो व मला विचार स्वातंत्र्य आहे म्हणून छातीठोकपणे आपल्या बेताल बडबडीचे समर्थन करतो
कुरमुसे ,कंगना,केतकी ,आणि कामरा
आपणास आठवत असेल सांगली येथील एक करमुसे नावाच्या तरुणास महाविकास आघाडी सत्तेवर असताना त्यांनी काही फेसबुक पोस्ट केली होती त्यावर त्याला महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड व त्यांच्या टोळक्याने आव्हाडांच्या घरी नेऊन मरेपर्यंत मारला होता.
दुसरी म्हणजे केतकी चितळे या युवतीने एक पोस्ट शेअर केली होती. त्यावरती तीच्यावर शेकड्याने फिर्यादी दाखल केल्या गेल्या व तिला 40 दिवस तुरुंगात राहावे लागले. तिला तिच्यावर जाहीरपणे बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.
कंगना रावत या सिने अभिनेत्रेचे तिने काही उद्धव ठाकरे यांच्या बद्दल उद्गार काढले म्हणून तिचे मुंबईतील घर पाडण्यात आले
केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनातर घरातून भरल्या ताटावरून उचलून नेण्यात आले.
अर्णव गोस्वामी याची तर कथा सर्वांना माहित आहे.
या सर्व घटना व अशा अनेक घटना महाविकास आघाडी सत्तेवर असणाऱ्या काळात घडल्या त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते सांगतील तो कायदा लागू होता.
हे सर्वजण आता सत्तेपासून दूर गेल्यावर त्यांना विचार स्वातंत्र्य उच्चार स्वातंत्र्य याची मोठी काळजी लागून राहिली आहे.
करोडपती कामरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामरा नावाच्या एका कॉमेडीयने काही गाणी केली त्यावर ती बदनामीकारक आहेत म्हणून त्याच्यावर फिर्याद दाखल झाली. इथपर्यंत ठीक आहे पण कामराने केले हे बरोबर आहे विचार स्वातंत्र्य प्रमाणे आहे म्हणून गौरव केला गेला. एवढ्यावर भागले नाही तर घटना घडल्यापासून सात दिवसाच्या आत कामराच्या खात्यावर लोकांनी त्याला शिंदेंच्या वर कविता केल्याबद्दल साडेचार कोटी रुपये पाठवून दिले.
हा काय प्रकार आहे.
ही काय विचारसरणी आहे.
करमुसे ,कंगना, केतकी यांनी व अर्णव गोस्वामी व नारायण राणे यांनी आपल्या विचार स्वातंत्र्याबद्दल मोठ्या सूडाचे प्रवासातून जावे लागले पण कामरा याला मात्र कोट्यावधी रुपये मिळाले विशेष म्हणजे या रकमा मोठ्या प्रमाणात गल्फ कंट्री मधून आलेल्या आहेत
म्हणजे या देशातील राष्ट्रभक्त नागरिक किंवा नेते यांच्या बद्दल खालच्या पातळीवरून टीका केली असता त्याला ठरवून बहुमान दिला जातो त्याचा गौरव केला जातो व त्याला भरमसाठरीत्या आर्थिक मदत दिली जाते.
ही सर्व डाव्या विचारसरणीची व जातीयवादी लॉबी किती पावरफुल झाली आहे याचा पुरावा आहे.
कामराबद्दल अनेक नेत्यांनी कामराशी बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या
तर विचार स्वातंत्र्य मांडताना कोणी भोगले व कोणाला भावले हे या प्रकरणातून दिसून आले आहे.
करोडपती होणार का तुडवून घेणार
समाजात एक संदेश गेला आहे जर तुम्ही राष्ट्रवादी नेते ,राष्ट्रवादी नागरिक याना विचार स्वातंत्र्याचा वापर करून बदनाम कराल तर तुम्ही करोडपती व्हाल.
पण जर खरे बोलाल तर तुम्हाला तुडवले जाईल,अटकेत टाकले जाईल ,जेवणाच्या ताटावरून उचलून अटक केली जाईल व तुमचे घर पाडले जाईल.
बघा विचार करा
पसंती तुमची
ॲड अनिल रुईकर
९८२३२५५०४९
इचलकरंजी