ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मध्ये सॉफ्ट स्किल वर्कशॉप चे उद्घाटन संपन्न
ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मध्ये सॉफ्ट स्किल वर्कशॉप चे उद्घाटन संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 20/12/2023 :
ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मध्ये दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी बीसीए व बीएससी ईसीएस व एम एस सी च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामार्फत व रुबीकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट सेल विभागातर्फे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग चे आयोजन करण्यात आले .
या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सुभाष शिंदे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थी हा हुशार व कष्टाळू आहे ,पण संभाषण कौशल्य , इंग्रजी विषयाची मांडणी , आत्मविश्वास यामध्ये थोडा कमी पडत असल्याने अनेक चांगल्या संधी पासून त्याला मुकावे लागते अशा गोष्टी वारंवार होऊ नयेत म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय प्लेसमेंट विभाग व रुबीकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग चे आयोजन करण्यात येते .
या ट्रेनिंग मध्ये विद्यार्थ्यांना इंटरव्यू स्किल , कम्युनिकेशन स्किल ,लाइफ स्किल्स ,सॉफ्ट स्किल चे ज्ञान विविध ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून दिले जाते . व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज बनली आहे . या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकून राहायचे असेल तर व्यक्तिमत्व विकासाला खूप महत्त्व दिले गेले पाहिजे .
विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना आपल्या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्याचा विकास करावा सातत्यपूर्ण व कौशल्य पूर्ण ज्ञान घेऊन मेहनत घेऊन आपले ध्येय गाठावे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले .
या उद्घाटन प्रसंगी रुबीकॉन प्रायव्हेट लिमिटेड चे ट्रेनर सुरेश चव्हाण, माही शहा,साची माटे ,शंकरी वैद्य यांचा सन्मान महाविद्यालयातर्फे करण्यात आला .
या कार्यक्रमाप्रसंगी बीएससी ई सीएस विभागाचे विभाग प्रमुख डॉ . तुळशीराम पिसाळ, एम एस सी विभाग प्रमुख व प्लेसमेंट सेलचे प्रमुख संजय साळुंखे, बीसीए विभाग प्रमुख व प्लेसमेंट विभाग प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. धनश्री
हातोळकर यांनी केले व आभार संजय साळुंखे यांनी मांनले .