माळशिरस तालुक्यात महसूल सप्ताहाचा प्रारंभ

माळशिरस तालुक्यात महसूल सप्ताहाचा प्रारंभ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(आकाश भाग्यवंत नायकुडे)
मुंबई दिनांक 1/8/2023 :
लोकाभिमुख कामांचा निपटारा करण्यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी शासकीय स्तरावरून दरवर्षी हा सप्ताह आयोजित केला जातो. जनतेला देण्यात येणाऱ्या शासकीय महसुली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन साजरा केला जात असून पुढील सात दिवस हा महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे.
याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अकलूज उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माळशिरस तहसिलदार सुरेश शेजूळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज मंडल अधिकारी कार्यालय व अकलूज तलाठी कार्यालय, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह निमित्त आज (दि.1 ऑगस्ट) अकलूज शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली.
रॅलीमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, मंडल अधिकारी चंद्रकांत भोसले, वरिष्ठ तलाठी किसनराव शिंदे यांचे सह कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.