देशमुख पट्टा जि. प. प्राथमिक शाळेत जागतिक चिमणी दिन साजरा

देशमुख पट्टा जि. प. प्राथमिक शाळेत जागतिक चिमणी दिन साजरा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/03/2025 : माळशिरस तालुक्यातील देशमुख पट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील लहान मुलांनी चिमण्यांना चारापाणी व खाऊ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून चिमण्यांसाठी निवारा तयार करून त्यात चारापाणी ठेवले. “चिमणी वाचवा, चिमणी जगवा” हा संदेश देत छोट्या छोट्या मटक्यातून पाणी आणून विद्यार्थ्यांनी ते मटके झाडावर बांधले.अशा प्रकारे या चिमुकल्यांनी जागतिक चिमणी दिन साजरा केला आहे.
मोबाईलच्या जमान्यात चिमण्या कुठे दिसेना झाल्या आहेत. त्यामुळे आधुनिक युगात चिमणी कुठे हरवली हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चिमणी जगवा चिमणी वाचवा याविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नु. अ.तांबोळी यांनी माहिती दिली व सहशिक्षिका सुवर्णा घोरपडे यांनी आपल्या परिसरातील मुक्या प्राण्यांची व पक्ष्यांची उन्हाळ्यात आपण कशी काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली. इयत्ता ४ थी इयत्तेत शिकत असणाऱ्या सार्थक सुधीर शेलार या विद्यार्थ्यांने चिमणीसाठी खूप छान निवारा बनवून आणला होता.शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही चिमण्यांना पाणी ठेवण्याची मातीचे मटके आणून त्यात पाणी घालून झाडावर ठेवण्यात आले.अशा प्रकारे शाळेत जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला.