मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/03/2025 : आपल्या घराची रचना करताना समोरासमोर दारे-खिडक्या येतील याची काळजी घेतली जाते. घरात खेळती हवा व भरपूर उजेड यावा आणि घरातील वातावरण आरोग्यदायी रहावे हा त्यामागील हेतू असतो.
अगदी तसेच आपल्या शरीराचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मन मोकळे होणे गरजेचे असते. मनाचे दरवाजे व खिडक्या म्हणजे आपली जवळची, विश्वासाची आपली माणसे. ज्यांच्याजवळ आपण आपल्या मनातील ताण-तणाव मोकळे करू शकतो.
तणावमुक्त, हलके-फुलके मन, प्रसन्न मन आपले आरोग्य जपते. मनाचा कोंडमारा होत असेल, कोणाजवळ मोकळे करता येत नसेल तर आतमध्ये जी घुसमट होते ती फक्त मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यावरही दुष्परिणाम करते.
आजचा संकल्प
आपले मनातील आनंदाचे, दुःखाचे, चिंतेचे जे काही विचार असतील ते व्यक्त करण्यासाठी आपले जवळचे नाते जपू व एकमेकांना मानसिक आधार देऊ._
सौ. स्नेहलता स. जगताप