मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/03/2025 : आपले कुटुंबीय, नातलग, मित्रपरिवार यांच्यापैकी कोणी अडचणीत असेल तर त्यांना मदत करावी, सहकार्य करावे असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे. ते आपले कर्तव्यच आहे.
पण याही पुढे जाऊन अपरिचित व्यक्ती जरी अडचणीत असतील तरी त्यांना सहकार्य करणे ही खरी माणुसकी. समाजात जात-पात, धर्म-पंथ या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता माणसाशी माणूस म्हणून वागणे खरे महत्वाचे.
मनाचे सौंदर्य म्हणजे वेगळे काय? चेहऱ्याच्या देखणेपणापेक्षा व सौंदर्यापेक्षा तुमच्या स्वभावाचे पैलू जास्त महत्वाचे. समजूतदारपणा, संवेदनशीलता, दया-माया-आपुलकी वाटणे, समोरच्या व्यक्तीचा जीव जाणणे हे खरे सौंदर्य.
आजचा संकल्प
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे विचार करतो, कसे वागतो हे जास्त महत्वाचे आहे. माणूस म्हणून ते महत्वाचे आहे हे लक्षात ठेवू व माणूसपण जपू.
_- सौ. स्नेहलता स. जगताप._