अकलूज येथे राम नवमी निमित्त मोफत गर्भसंस्कार शिबिर.
अकलूज येथे राम नवमी निमित्त मोफत गर्भसंस्कार शिबिर.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/03/2025 : मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज आणि रोटरी क्लब ऑफ अकलूज यांच्यावतीने रामनवमीनिमित्त रविवार दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधीत स्मृतीभवन शंकरनगर येथे गर्भवती महिलांसाठी मोफत गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भ संस्कार शिबिर आयोजित केले असल्याची माहिती मनशक्ती केंद्र अकलूज चे केंद्रप्रमुख हनुमंतराव खडके यांनी दिली. या शिबिरात कोणत्याही महिन्यातील गर्भवती मातापित्यांना सहभाग घेता येईल. या शिबिरात संस्कार म्हणजे काय व ते कसे करावेत, गर्भासाठी स्वागत, प्रार्थना, संगीत, गोष्ट, गर्भाला कळते याचे पुरावे, स्ट्रोबोस्कोप चाचणी आणि उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. सुदृढ सतेज सुसंस्कारी पिढीसाठी हा विनामूल्य उपक्रम असून यामध्ये गर्भसंस्कारा संबंधीत मोफत पुस्तके ही देण्यात येणार आहेत. याकरिता नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणीसाठी ॲड. प्रवीण कारंडे 99 222 39906, हनुमंत (आप्पा) खडके 99 60002734, प्रिया नागणे 98 60 89 16 16, गजानन जवंजाळ 94 23 32 79 03 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ही आयोजकांनी केले आहे.