श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात ‘रत्नाई महोत्सव’ संपन्न

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात ‘रत्नाई महोत्सव’ संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/03/2025 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात ‘रत्नाई महोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून जिजामाता कन्या प्रशाला मुख्याध्यापिका सौ सुनिता शहाजी.वाघ उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी डॉ. भारती भोसले या होत्या. या महोत्सवादरम्यान विद्यार्थिनींसाठी विविध डे चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फेटा डे, रिजनल डे, बॉलिवूड कॅरेक्टर डे, ट्विन्स डे अशा विविध डे चे आयोजन करण्यात आले होते.
त्याचबरोबर अनेक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अंताक्षरी स्पर्धा, नृत्य स्पर्धा (वैयक्तिक, ड्युएट व समूह नृत्य स्पर्धा), तसेच बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर, फॅशन शो, खानाखजाना, फिश पोंड्स, पालक सभा व क्रीडा स्पर्धा इत्यादी अनेक उपक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी सर्व स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रत्नाई महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला. यावर्षीची बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर कु. जागृती लक्ष्मण ऐवळे ही तृतीया वर्षाची विद्यार्थिनी ठरली. तर उपविजेती कु. करिष्मा नवनाथ कर्चे ही तृतीय वर्षाची विद्यार्थिनी निवडली गेली. यानिमित्ताने जिजामाता कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता शहाजी वाघ यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. सदर ‘रत्नाई महोत्सव’ महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सभापती कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून पार पडला. या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. रत्नाई महोत्सवाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. छाया भिसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील डॉ. अमित घाडगे, डॉ. भारती भोसले, डॉ. राजश्री निंभोरकर, डॉ. जयशीला मनोहर, डॉ. ऋषी गजभिये, कोरे के के, सर्व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.