सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/03/2025 : आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “वुमेन्स हेल्थ अँड हायजिन” या विषयावर व्याख्यान संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर व्याख्यानाकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्चना गवळी, संचालक, गवळी हॉस्पिटल, अकलूज या उपस्थित होत्या. महिलांनी स्वतःची काळजी कशी व कशासाठी घेतली पाहिजे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या शारीरिक समस्या व त्यांचे निवारण कसे केले पाहिजे याबद्दल माहिती दिली. मानसिक आरोग्याच्या समस्या याबद्दल सखोल मार्गदर्शन करून, नियमित व्यायाम, संतुलित पोषण आणि तणाव व्यवस्थापन तंत्रांसह, निरोगी जीवनशैली राखण्यासाठी मोलाचे सल्ले दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेणुका सावळे व प्रा. आरती डांगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेऊ समन्वयक म्हणून प्रा. प्रगती पाटील यांनी काम पाहून उपस्थितांचे आभार मानले.