ताज्या घडामोडी
कै. तानाजीराव शंकरराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त फुलाचे कीर्तन

कै. तानाजीराव शंकरराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त फुलाचे कीर्तन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/02/2025 : पाटीलवस्ती रेडणी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील कै.तानाजीराव शंकरराव पाटील (माजी तालुका अध्यक्ष, इंदापूर तालुका काँग्रेस) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त (वर्ष श्राद्ध) बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत फुलाचे कीर्तन आयोजित केले आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज श्री गुरु पा. बाळासाहेब महाराज ज्ञानेश्वर माऊली देहूकर, पंढरपूर यांच्या फुलाच्या कीर्तन सेवेनंतर 12 वाजता पुष्पवर्षाव होईल. तरी या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.