गृहविज्ञान महिला महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/02/2025 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय व शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 25.02.2025 रोजी ‘फूड प्रोसेसिंग व फ्रुट प्रीजर्वेशन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय, अकलूज येथे करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ.जयशीला मनोहर या उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी डॉ. भारती भोसले या होत्या. याप्रसंगी डॉ. जयशीला मनोहर यांनी अन्न संरक्षण, अन्नप्रक्रिया व त्याचे जीवनातील महत्त्व व यातून निर्माण होणारे लघुउद्योग याविषयी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ॲपल जॅम, मिक्स फ्रुट जॅम, टोमॅटो सॉस, ड्राय कोकोनट चटणी, तसेच कढीपत्ता चटणी इत्यादी पौष्टिक पदार्थाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच हे पदार्थ बनवीत असताना मेजरिंग स्पून, मेजरींग कप व संरक्षके याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सदर कार्यशाळेत शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सविता सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. भारती भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. सविता सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन कु. वैष्णवी मगर व आभार प्रदर्शन कु. सृष्टी पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अमित घाडगे, डॉ. ऋषी गजभिये, प्रा. प्रतिभा नलवडे, दीपक शिंदे, बाळू पवार व बी.एससी. भाग दोन मधील सर्व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.