चिक्या – बकासुर व मामा भाचा बैलगाडा “सहकार महर्षि केसरी” प्रथम पुरस्काराचा मानकरी

चिक्या – बकासुर व मामा भाचा बैलगाडा “सहकार महर्षि केसरी” प्रथम पुरस्काराचा मानकरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/02/2025 : सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते – पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शंकरनगर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल, अकलूज समोरील पटांगणावर ‘सहकार महर्षि केसरी 2025’ ओपन भव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान संपन्न झाले.
या नयनरम्य शर्यतीचे मैदान चिक्या – बकासुर व मामा भाच्याच्या जोडीने तीनशे मीटर अंतर केवळ 13 सेकंदात पार करून सहकार महर्षि केसरी 2025 बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून रोख रु. 1 लाख 50 हजार, स्मृतिचिन्ह व बैलांना झुल असे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. बैलगाडा शर्यत मैदान पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते – पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण आबा पाटील, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार. रामहरी रुपनवर, बाबाराजे देशमुख, माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, नितीन खराडे, सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, सौ. शीतलदेवी मोहिते पाटील, माजी सभापती. सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगांवकर, कृ. बा. स. उपसभापती मामासाहेब पांढरे, व्हा चेअरमन.शंकरराव माने देशमुख,ॲड प्रकाशराव पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, माजी सभापती रावसाहेब पराडे, बाळासाहेब होले, माजी उपसभापती प्रताप पाटील, मच्छिन्द्र ठेवरे, रवी पाटील, सहकार महर्षि कारखान्याचे संचालक, श्री शंकर सहकारी कारखान्याचे संचालक, शिवामृत दूध संघांचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी – विक्री संघांचे संचालक, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पोलीस पाटील, रेशन दुकानदार, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शर्यतीचे झेंडा पंच म्हणून राजेंद्र धनवडे यांनी काम पाहिले तर सुनील मोरे व विकास जगदाळे यांनी शर्यतीचे उत्कृष्ट असे समालोचन केले.