माळीनगरचे शिल्पकार कै.हरिभाऊ गिरमे यांची 127 वी जयंती साजरी

माळीनगरचे शिल्पकार कै.हरिभाऊ गिरमे यांची 127 वी जयंती साजरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
माळीनगर/प्रतिनिधी दिनांक 07/02/2025 :
येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर या साखर कारखान्याच्या संस्थापकांपैकी एक व माळीनगरचे शिल्पकार कै.हरिभाऊ बळवंतराव गिरमे यांची १२७ वी जयंती दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्रशालेतील कै.हरिभाऊ गिरमे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व व्यासपीठावरील प्रतिमेचे पूजन दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, ज्येष्ठ शिक्षक वसंत पिंगळे, सुनील लांडगे, सुनील शिंदे, शिक्षिका सविता पोटे,सुवर्णा पोळ,आशा रानमाळ,मेघा जोशी,सुखदा विधाते व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन प्रशालेचे उपप्राचार्य रितेश पांढरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थिनी सिद्धी हेगडकर,त्रिशा शिंदे, तब्बसूम शेख,आदिती पांढरे, निलोफर शेख यांची भाषणे झाली.यानंतर त्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेन देवून त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अभिजीत हेगडे,रणजीत लोहार, बाळासाहेब सोनवणे यांचे सहकार्य लागले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले तर आभार रणजीत लोहार यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.