राष्ट्र सेविका समिती तालुका माळशिरस येथे मकर संक्रमण उत्सव उत्साहात संपन्न

राष्ट्र सेविका समिती तालुका माळशिरस येथे मकर संक्रमण उत्सव उत्साहात संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
सुजाता गोखले
माळशिरस दिनांक 07/02/2025 : माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शाखा माळशिरस चा मकर संक्रमण उत्सव साजरा झाला़ यासाठी प्रमुख अतिथी माळशिरस नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा मंगल दत्तात्रेय केमकर,सोलापूर जिल्हा कार्यवाहिका देवयानी विश्वास देशमुख, माळशिरस तालुका कार्यवाहिका लता माधव मिरासदार तसेच राष्ट्रसेविका समिती माळशिरस च्या सर्व सेविका उपस्थित होत्या मंगल केमकर, देवयानी देशमुख, लता मिरासदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पाहुण्यांचा परिचय रूपाली शरद मदने यांनी करून दिला. त्याचबरोबर धर्म व संस्कृतीच्या साधनेतून राष्ट्र विकास करण्याची राष्ट्र सेविका समितीची आकांक्षा आहे राष्ट्राचे केंद्र म्हणजे कुटुंब व कुटुंबाचे केंद्र म्हणजे माता. एक माता सुसंस्कारित असेल तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कारित होते.वंदनीय मावशींनी दिलेली जीवनधारक चतुसूत्री सामाजिक अज्ञान दूर करणे धर्माचे यथार्थ ज्ञान श्रद्धास्थान अध्यात्माचा आधार हे सांगण्यात आले.सूत्रसंचालन अपर्णा विवेक इनामदार यांनी केले त्यावेळी राष्ट्र सेविका समिति ही भारतातील हिंदुत्ववादी महिला संघटना असून 25 ऑक्टोबर 1936वंदनीय मावशी उर्फ लक्ष्मीबाई पुरुषोत्तम केळकर यांनी केली हे सांगितले जवळजवळ 88 ते 89 वर्षे हे काम अविरतपणे चालू आहे हे सांगण्यात आले छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.त्याचीच एक छोटीशी शाखा११ जून २०२४माळशिरस येथे सुरू झाली. तसेच शाखेमध्ये साजरे केलेले विविध उत्सव सांगितले. लता मिरासदार यांनी शाखा घेतली. वैयक्तिक पद्य कार्तिकी टिंगरे हिने म्हटले तसेच सांघिक पद्यअहिल्या मदने, सिद्धी घुले, श्रेया शिंदे, निशा मंजुळे या शाखेतील मुलींनी म्हटलेव प्राची प्रकाश कुलकर्णी,आरती अनंत कुलकर्णी,यांनी हळदीकुंकू तसेच तिळगुळ वाटप केले.26 जानेवारी निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते त्याचे बक्षीस वितरण मंगल केमकर व देवयानी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर प्रमुख अतिथी देवयानी देशमुख यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्री जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याची महती सांगत मुलींना प्रश्न विचारून प्रोस्ताहीत केले. तसेच देवयानी यांनी विविध प्रश्न विचारून सर्व माता सर्व माता-भगिनींना चहापान झाले. नीता महेंद्रकुमार राजमाने यांनी आभार मानले.