ताज्या घडामोडी

ना तो कारवाॅ की तलाश है

 ना तो कारवाॅ की तलाश है

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29/01/2025 : उर्दू शेर शायरी हा अतिशय वेगळा आणि आनंददायी विषय आहे. त्यातील अभ्यासू व्यक्तिनाच त्याचे रसग्रहण व त्याचा आनंद मिळू शकतो. परंतु सर्वसाधारण मराठी माणूस ज्यावेळी उर्दू शेर शायरीचा आधार घेऊ लागतो त्यावेळी नक्की समजावे एक तरी याचा प्रेम भंग झाला असावा किंवा तो हताश किंवा निराश असावा.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील एक नाशिक भागातील नामवंत(?) पुढारी छगन भुजबळ यांना या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी उर्दू शेर शायरीचा आधार घेत आपली हताशा व दुःख व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी
कारवाॅ बदला जाता है लेकिन मंजिल वही रहती है
अशा अर्थाची शेर शायरी पत्रकारांच्या पुढे म्हणून दाखवली.
त्यांचे म्हणण्याचा अर्थ असा होता की आपला पक्ष ,विचारसरणी व गट एक वेळ बदलला तर चालेल पण आपले उद्दिष्ट मात्र चालू ठेवले पाहिजे. याचा अर्थ आपल्या उद्दिष्टाकडे जाताना आपण आपला गट, पक्ष बदलणे आवश्यक वाटल्यास बदलावा.
मंडई ते महापौर
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक तळागाळातल्या कार्यकर्त्यांना उचलून धरून त्याला त्यांच्या स्वप्नातही नसलेल्या पदावरती नेऊन ठेवले. भुजबळ याना तर मंडई पासून महापौरपदी नेऊन ठेवले.
शिवसेनेत राहून महापौर पदापासून विरोधी पक्ष नेत्यापर्यंत व मंत्रिमंडळात स्थान मिळवले. पण ज्यावेळी यापेक्षा अधिक मिळत नाही असे वाटले त्यावेळी शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये सामील झाले.
काँग्रेसमध्ये पण त्याना मंत्रीपदे मानसन्मान भरपूर मिळाला पण असमाधानामुळै शरद पवारांच्या बरोबर त्यांनी काँग्रेस सोडली.
शरद पवार यानी भुजबळना जी संधी दिली की त्यांनी आपल्या रक्ताच्या नातेवाईकांनाही दिली नाही. पण त्यांनी एके दिवशी शरद पवारांचा हात पण सोडला व ते अजित पवारांना जाऊन मिळाले.
त्यांचा हा राजकीय इतिहास पाहिला असता त्यांनी चार-पाच वेळा त्यांच्या भाषेत मंजिल साठी काय कारवाॅ बदलला.
आता मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते पुन्हा कारवाॅ बदलायच्या मनस्थितीत आहेत. हे ते शेर शायरी तून व्यक्त करत आहेत.
सत्ता म्हणजे काय प्राणवायू आहे
आपल्या देशात काँग्रेस पक्षाने अशी संस्कृती आणली आहे की सत्ते शिवाय नेते जगू शकत नाहीत. सत्ता हा त्यांच्यासाठी प्राणवायू आहे.
छगन भुजबळ यांची मंजिल काय आहे, त्याला सत्ता कश्यासाठी हवी आहे, जनतेचे प्रेम, जनतेची कामे विकास व जनतेची सेवा यासाठी त्यांना सत्ता हवी आहे असा त्याला भ्रम झाला आहे व त्यांनी इतरांना पण भ्रमीत केले आहे.
ज्याला जनतेची ,पददलीताची सेवा करायची आहे त्याला आपल्या महाराष्ट्रात बाबा आमटे यांच्यापासून अनेक जण आदर्श आहेत नानाजी देशमुख यांनी साठाव्या वर्षी सक्रिय राजकारणाचा त्याग करून मोठ्या प्रकार कार्य उभे केले ही पण जनतेची सेवाच आहे
आज भुजबळ 77 वर्षाचे आहेत त्यापैकी 45 वर्षे त्यांनी मोठ-मोठी पदे भोगुन ,सत्तेला चिकटून राहून काय काय मिळवले आहे हे सर्व महाराष्ट्रास, महाराष्ट्रच काय पण ईडी, इन्कम टॅक्स यांनी पाहिलेले आहे.
जनतेची सेवा करून त्यांचे मन भरलेले नाही.
त्याना अजून जनतेची सेवा करायची आहे ती त्यांनी बाबा आमटे नानाजी देशमुख यांच्यासारखे आदर्श ठेवून केल्यास त्यांची मंजिल ही जनतेची सेवा आहे ती त्यांना करता येईल पण त्याचा कारवाॅ बदलण्याची अजून इच्छा भागलेली नाही
म्हणून
ना तो कारवाॅ की तलाश है
हे जुने गाणे आठवत आहे.

ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी
पुढील लेख
*हॅलो बेबो हाऊ आर यू

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button