“एकबोटे भी मिनिस्टर खाता है।”
“एकबोटे भी मिनिस्टर खाता है।”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28/01/2025 :
‘कत्तलखान्यातून होतो आतंकवाद्यांना अर्थ पुरवठा’
सन २००२ साली मी पुण्यामध्ये हिंदुत्ववादी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मला ध्यानीमनी नसताना गौहत्या थाबवण्यासाठी होणाऱ्या संघर्षामध्ये स्व:ताला यात झोकून द्यावे लागले.
बकरीईदच्या आधी एकदोन दिवस मार्केट यार्ड येथील जनावरांच्या बाजारात शेतकी महाविद्यालयाच्या २०० विद्याथ्यांना घेऊन मी घुसलो आणि त्या ठिकाणी ५०-६० बैल कत्तलीसाठी कसायांनी खरेदी केल्याचे लक्षात आल्यावर आम्ही त्याला तीव्र विरोध करून तो व्यवहार रद्द केला. शेतकऱ्यांना आपले बैल परत न्यायला लावले आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचा भंग करणारा बाजार संपूर्णपणे बंद पाडला त्या ठिकाणी असलेली गोतस्करांची लॉबी खवळली. परंतु आम्हा सर्वांच्या जोशामुळे त्यांना हात चोळत बसावे लागले.
त्यावेळी शमशुद्दीन मुश्रीफ
(मंत्री हसन मुश्रीफ चा भाऊ) हा जातीयवादी प्रवृत्तीचा सहपोलीस आयुक्त पुण्यामध्ये कार्यरत होता. त्याने अधिकाराचा गैरवापर करून मी मार्केटयार्ड मध्ये असतानाच मला पुण्यातून सात दिवसांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. कसायांचे लांगुलचालन करण्याचा हा प्रकार होता. मी कायदेशीर मार्गाने गोहत्या बंदीचा विषय रेटत होतो आणि कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणेंनी मलाच लक्ष केले!.
त्यावेळी मी श्री क्षेत्र गोंदवले येथे श्री गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. सर्वश्री अशोक औताडे आणि भाऊ आल्हाट हे माझे सहकारी सुद्धा माझ्याबरोबर बायला निघाले गोंदवले येथे पोहोचल्यावर दर्शन व प्रसाद झाल्यावर आम्ही पुढील प्रवासासाठी सिद्ध झालो होतो. तो दिवस गुरुवारचा असल्यानें श्री महाराजांच्या समाधीच्या दर्शनामुळे विशेष समाधान वाटत होते. परंतु महाराजांनी आमच्याकडून मोठी सेवा करून घेण्याचे ठरवले होते.
मंदिरातून बाहेर पडल्यानंतर केवळ पाच मिनीटात मला एक गाई घेऊन जाणारा ट्रक दिसला. मला धक्काच बसला गोरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदवले नगरीत गोमातेची होणारी विटंबना मनाला अस्वस्थ करून गेली १७-१८ गाई एका ट्रक मध्ये अक्षरशः कौबल्या होत्या. मी अंबादास भापकर या माझ्या ड्रायव्हरला गाडी जोरात चालवून ट्रकचा पाठलाग करण्यास सांगितले. तो परिसर मला अपरिचित होता. पोलीस स्टेशन कुठे असेल याची कल्पना नव्हती लोकांना विचारत बसलो तर ट्रक निसटण्याची भीती होती, अशा परिस्थितीत फलटण पर्यंत ट्रकचा पाठलाग चालू ठेवून त्या गावात पोलीस स्टेशन जवळ तो अडवला आणि ट्रक पोलीस स्टेशनमध्ये नेण्यास ट्रक ड्रायव्हरला भाग पाडले. त्यानंतर पुढे नव्या संघर्षाला सामोरे जावे लागले.
२५ ते ३० कसायांची झुंड घेऊन रघुनाथ राजे निंबाळकर नावाचा युवक पोलीस स्टेशनमध्ये येऊन मला दमदाटी करून गाडी सोडून देण्याचे मागणी करू लागला. आम्ही त्याला निर्धाराने सांगितले. काहीही झाले तरी गाई गोशाळेतच जातील, प्रभू रामचंद्रांवर नितांत श्रद्धा असल्याने ५-६ तास सर्व प्रकारचे ताण तणाव आणि राजकीय दबाव सहन करून पोलीस निरीक्षक श्री मेहता या सुजाण अधिकाऱ्याच्या सहकार्यामुळे सर्व गाई गोतस्करांच्या तावडीतून सोडवून गोशाळेत पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो. सातारा जिल्ह्यातील हे पहिलेच गोरक्षण असल्याने ही बातमी गाजली होती! आमचे प्रतापगडाचे आंदोलन हो त्यावेळी जोरात चालू असल्याने या गोरक्षणाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. फलटणमध्ये थोडी खळबळ झाली आणि काही गोप्रेमी युवक त्यामुळे माझ्या संपर्कात आले.
पुढे दोन-तीन दिवसात माझी तडीपारी संपली आणि माझ्या नेहमीचा दिनक्रम सुरू झाला. दुसऱ्याच दिवशी फलटणचे एक डॉक्टर मला भेटायला आले या गोरक्षणामुळे ते खूपच आश्चर्यचकित झाले होते. त्यामुळे माझे अभिनंदन कराण्यासाठी ते खास पुण्यात आले होते. त्यांनी मला आश्चर्यकारक माहिती पुरवली. ते म्हणाले “कसायांच्या प्रत्येक गल्लीतील घरात माझे पेशंट आहेत. सध्याच्या बेसुमार गाईची कत्तल फलटणमध्ये झाली आहे. एका वर्षात फलटणमधील ३० कसाई करोडपती झाले आहेत मला ही माहिती ऐकून धक्काच बसला.
मला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले! एका वर्षात प्रत्येक एक करोड रुपयाची प्राप्ती हा विषय मती गुंग करणारा होगा. मी त्या डॉक्टरांना माझी शंका विचारली त्यांनी दिलेले उत्तर मला धक्का देणारे होते. ते म्हणाले दुष्काळामुळे केवळ तीन ते पाच हजार रुपयाला गाय कसायाला विकत मिळते. परंतु कमाई त्या गायीपासून ५० ते ६० हजार रुपये कमवतो. हे कसं काय शक्य आहे?’ असे त्यांना मी विचारले. त्यांनी माहिती सांगितली कसायांच्या गल्लीत बांगलादेशी जोडपे आहे ते नाजूक पद्धतीने देशी गाईच्या शरीरातील विशिष्ट भाग काढते. या वस्तूची चीनला चोरटी निर्यात होते आणि त्यासाठी दहा ग्रॅमला तीस हजार रुपये असा भाव मिळतो. गाईच्या शरीरातील हा भाग असाध्य रोगांवरील औषधे बनवण्यासाठी चीनमध्ये वापरला जातो या घटकाची चीनमध्ये चोरटी निर्वात होते असे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या माहितीमुळे आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. ते म्हणाले गाईच्या शरीरातील रक्त काढून घेतले जाते ते शिरवळ येथील एका औषधाच्या कारखान्याला विकले जाते. हिमोग्लोबिन कमी असलेल्या पेशंटसाठी टॉनिक बनवण्यासाठी ते रक्त वापरतात या रक्ताच्या व्यापारातून कसायला १० हजार रुपये मिळतात, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय कातडी आणि नावाचे विक्रीतून सुद्धा कसायांना पंधरा ते वीस हजार रुपये मिळतात. असे त्यांनी सांगितले. पुढची माहिती अत्यंत गंभीर होती. डॉक्टर म्हणाले गाईची हाडे कसाई विकत नाहीत ती इस्लाम ची संपत्ति मानतात.सर्व कसाई कत्तली नंतर साठलेली हाड़े एकत्र करुण खताच्या कारखान्याला विकतात. आणि ते पैसे अतिरेक्याच्या कारवायाना पुरवले जातात. ही माहीती मिळाल्या नंतर विचाराचे चक्र वेगाने फिरू लागले. मी या प्रकारचा तपास करण्याचा मनोमन निर्धार केला आणि कामाला सुरुवात केली.
सातारला जाऊन केंद्रीय गुप्तचरच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना ‘टेररिस्ट फंडिंग’ ची माहिती दिली. श्री गोपाळकृष्णन नावाचे अधिकारी होते. ते आशर्याने थक्क झाले. त्यांना मी सर्व माहिती लेखी स्वरूपात दिल्यावर कारवाईचा आग्रह धरला. परंतु त्यांनी टाळाटाळ केली. ते म्हणाले तुमच्या जिवाला धोका निर्माण होईल. मी त्यांचे म्हणणे खोडून काढले ‘गोमाता माझे रक्षण करेल’ असे मी त्यांना ठासून सांगितले.
सततच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी कारवाईची तयारी सुरू केली. फलटणहून मुंबईला जाणाऱ्या हाडांच्या ट्रकची माहिती मी त्यांना दिली. नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेतली. त्यावेळी तत्कालीन आमदार रामराजें निंबाळकर यांचा फोन गोपाळकृष्णन यांना आला आणि त्यांनी दमदाटीच्या स्वरात कसायांची हाडे घेऊन जाणारी वाहने सोडण्याची मागणी केली. गोपाळकृष्णन साहेबांनी ही मागणी धुडकावली त्यांनी आमदार महाशयांना टेररिस्ट फंडिंग ची माहिती सांगितलीं. तरीसुद्धा रामराजेंनी गाड्या सोडण्याची मागणी लावून धरली. नाराज झालेल्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवानी यांच्याकडे रामराजे विषयी तक्रार केली. त्यावेळी अडवानीजींच्या कार्यालयाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे फॅक्स पाठवून रामराजेंची माहिती मागवली. त्यांना कळले की उद्या दुपारी रामराजेंचा गृहराज्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. ही माहिती मिळाल्यावर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने या शपथविधीला विरोध केला. जो टेररिस्ट फंडिंग विषयी संवेदनशील नाही तो गृहराज्यमंत्री होऊ शकत नाही, या मुद्यावर रामराजेंचा शपथविधी त्यावेळी रद्द करावा लागला होता. ही बाब आ गोपनीय ठेवण्यात आली. याला म्हणतात गोमातेचा शाप हे प्रकरण चालू असतानाच गाईंची हाड़े कोणत्या कारखान्यात ते शोधून काढण्यात आले.यातून एक गोपानीय माहिती पुढे आली गाईंची हाड़े ख़ताच्या कारखाण्यात पोहोचल्या नंतर मेंढी बाजार मधील धर्माधांच्या विशिष्ट खात्यात पैसे जमा होतात.
इथपर्यंत सर्व माहिती मिळाल्यानतर गाईच्या हाडांच्या पैशातून टेररिस्ट फंडिंग होते या विषयावर जवळजवळ शिक्कामोर्तबच झाले होता. ही माहिती पुण्यातील ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत आणि सेवानिवृत अधिकारी डॉ. जी. सी. असनानी यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनेटवर टाकली तेव्हा मोठी खळबळ माजली. राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही माहिती पोचवण्यात आली. अपेक्षा होती की या गंभीर प्रकरणामुळे गोहत्या बंदी प्रभावीपणे राबवली जाईल. परंतु दुर्दैवाने तसे काही झाले नाही परंतु या सर्व धडपडीमुळे कसायांचा आणि दहशतवादाचा जो संबंध आहे तो अधोरेखित झाला. संपूर्ण भारतात प्रथमच अशा प्रकारचा मौल्यवान तपास झाल्याचे गुप्तचर अधिकाऱ्यांनी मला सांगितले. एक अधिकारी विनोदाने मला म्हणाले अण्णा हजारे मिनिस्टर खाता है यह मालूम था मगर एकबोटे भी मिनिस्टर को खाता है यह बात आजही मालूम पड़ी.”
एक-दोन दिवसांनी डॉ. असनानींकडे श्रीमती मेनका गांधींचा मेल आला होता त्यांनी सांगितले होते की भारतात दरवर्षी पाच कोटी गाई मारल्या जातात आणि प्रत्येक गायीच्या हाडाचे पाच हजार रुपये होतात एकूण प्रतिवर्षी कत्तलखान्यांमधून आतंकवाद्यांना २५ हजार कोटी रुपयांचा अर्थ पुरवठा होतो !.
अर्थात गोहत्येमुळे आपल्या शत्रुराष्ट्राची ताकद वाढ़ते गाय कत्तलखान्यात जाणे हा पाकिस्तानचा विजय
असतो आणि गाय गोशाळेत गेली तर तो पाकिस्तानचा पराभव होतो, हा निष्कर्ष युवकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात गावोगावी गोरक्षक टीकून राहिले. या घटनेमुळे लोकांना माझी काळजीवाटू लागली आहे. त्यांच्या मते कासायांशी थेट शत्रुत्व स्वीकारल्या मुळे तुमचे जीवन आता धोकादायक बनले आहे. त्यावेळी दिल्लीतील केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या आदेशानुसार मला २४ ताम संरक्षण पुरवण्यात आले. गेल्या पंचवीस वर्षात माइयावर वेळा जीवघेणे हल्ले झाले. परंतु गोमातेच्या कृपेने मी प्रत्येक प्रसंगातून सुखरूप बाहेर पडलो. माझे संरक्षण करणाऱ्या पोलिसांनी सुद्धा याबाबत माझी नेहमीच काळजी आणि मृत्यूच्या संकटापासून मला अनेक वेळा वाचवले अर्थात माझ्या श्रद्धेमुळे मला हा गोमातेचाच आशीर्वाद आहे असे मला ठामपणे वाटते. भारतामधील गोहत्या थांबली तर भारताची सुरक्षा आपोआप बळकट होईल. भारत ही जागतिक महाशक्ती होण्यासाठी या देशातील गौशक्तीची आम्ही जपणूक केली पाहिजे. गाय वाचली तरच हा देश वाचेल! गोहत्यामुक्त भारत हेच प्रत्येक भारतीय युवकाचे ध्येय असावे, हीच आमची एकमेव प्रामाणिक ईच्छा आहे.
गोमाता की जय !!!
मिलिंदभाऊ एकबोटे
समस्त हिंदू आघाडी, पुणे