ताज्या घडामोडी

“गेल्या 74 वर्षात भारताची लोकशाही खरंच प्रगल्भ झाली आहे कां?”- सुभाष मासुळे

“गेल्या 74 वर्षात भारताची लोकशाही खरंच प्रगल्भ झाली आहे कां?”- सुभाष मासुळे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 19/05/2024 :

भारताला लोकशाही गणराज्य म्हणून घोषित करून 74 वर्षे पूर्ण झालीत. या 74 वर्षांत लोकसभेच्या 18 निवडणूका संपन्न झाल्या. आतापर्यंत भारताने 15 प्रधानमंत्री पाहिले. या काळात प्रत्येक निवडणूकीत लोकांना काहींना काही आश्वासने देऊन अनेक पक्षांची सरकारे आली. मात्र या 75 वर्षात सुरवातीचा काही काळ अन्न,वस्र,निवारा या गरजा भागवण्यातच गेला. नंतर विकासाच्या टप्प्याला सुरुवात झाली. या काळात देशात उद्योगधंदे, धरणे, रस्ते निर्मितीला सुरुवात झाली. आता भराभराटीला सुरुवात होईल अशी अशा असतांना भारत-चीन, भारत-पाक युद्ध झाले व देश विकासाच्या टप्प्यापासून 5-6 वर्षे मागे लोटला गेला. भारत पाक युद्धानंतर देश पुन्हा नव्या दमाने भरारी घेऊ लागला. त्यासाठी लोकशाहीतील काही तत्वे आड येत असल्याने देशाच्या भरभराटीसाठी 42 वी घटनादरुस्ती करून आणीबाणी लागू करण्यात आली. पण आणीबाणी लागू करणे विरोधी पक्षांच्या पचनी पडले नाही. आणीबाणीचे राजकीय भांडवल करून,आफवा पसरवून विरोधकांनी डाव साधला. देश काही काळ पुन्हा अस्थिर झाला. या आणीबाणीत व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या त्या मर्यादा त्याकाळात लागू झाल्या असत्या तर देश प्रथम व त्यानंतर व्यक्तीला स्थान मिळाले असते व आज देश प्रगत राष्ट्राच्या यादीत राहिला असता. पण मतदारांच्या भोळेपणामुळे व अशिक्षितपणामुळे निव्वळ आफवांचा शिकार झाला. पुढे 44 व्या घटनादुरुस्तीत 42 व्या घटनादुरुस्ती रद्द करण्यात आली व पुन्हा पूर्वीच्या घटनेनुसार देश मार्गक्रमण करु लागला. पुढे काही वर्षे सरकारने देशाची परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याच सरकारने धाडसी पाऊले उचलली नाहीत. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे, बेरोजगारांचे प्रश्न अतिशय महत्वाचे होते.शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वामीनाथन आयोग नेमण्यात आला.या आयोगाने आपला आहवाल सरकारपुढे मांडला व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा अशी शिफारस केली पण तत्कालीन सरकारने व आतापर्यंत सत्तेत आलेल्या कोणत्याच सरकारने तो लागू केला नाही. कारण हा आयोग लागू केल्याबरोबर महागाई दुप्पट होईल अन्नधान्याच्या किंमती दामदुप्पट होतील म्हणून जे सरकार हा आयोग लागू करेल त्याला लोक मते देणार नाहीत व सत्तेतून हद्दपार करतील.अशी भीती सत्ताधारी व विरोधकांना आहे. त्यामुळे कोणतेच सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊ शकत नाही.उदा.कांद्याचा भाव वाढला तर मोठमोठे मोर्चे निघतात पण कांदा मातीमोल भावाने विकला गेला तर कोणीही आवाज उठवत नाही. लोकसंख्या वाढली पण लोकसंख्येच्या मानाने नोकऱ्या वाढल्या नाहीत. त्यामुळे शासकीय कामे वेळेवर होत नाहीत. पण नोकऱ्या वाढल्या तर सरकारला पगारावर मोठा खर्च करावा लागेल म्हणून खाजगीकरणावर भर दिला जातो. तसेच नोटबंदी केल्यामुळे काळापैसा बाहेर पडेल अशी लोकांची अपेक्षा होती म्हणून लोक सरकारला समर्थन देत होते पण झालं मात्र उलटच. काळा पैसा काही बाहेर आला नाही. कोणत्याही काळा पैशावाल्यावर कारवाई झाली नाही. झाली तर ती फक्त विरोध करणाऱ्यांवर झाली. उलट काळापैसावाले अधिकच सक्षम झाले.त्यातच पुढे कोरोनाचे महासंकट आले. त्यात तीन वर्षे देश ठप्प होता.त्यामुळे उत्पादनच नसल्याने देश विकासापासुन चार हात लांब गेला.अशा अनेक संकटांना तोंड देत देश मार्गक्रमण करत आहे. त्या त्या काळात कोणतेही सरकार असो पण ही सत्य परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे. पण निवडणूक काळात सर्वच पक्ष महत्वाचे, विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून जात,धर्म, संविधान इ.बाबत आफवा पसरवून लोकांना उल्लू बनवून सत्ता मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. एकदा सत्ता मिळाली की जनता गेली चुलीत. पाचवर्ष त्यांना कोणतेही देणेघेणे नाही. अशी अवस्था निर्माण झाली आहे. आज निवडणुकीची कोणत्याही पक्षाची प्रचारयंत्रणा पहिली तर त्यात सत्य स्थितीपेक्षा खोट्यानाट्या आफवावरच जास्त भर आहे. त्यासाठी मतदारांनी निव्वळ आफवांवर भरवसा न ठेवता.तल्लख बुद्धीने विचार केल्यास सदसद विवेक बुद्धीने कोणत्याही पक्षाचा असो योग्य, जनतेचे प्रश्न मांडणारा, सोडवणाऱ्या उमेदवारास भरभरून मते देऊन निवडून आणावे. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा. जास्तीतजास्त मतदान झाले तरच तुम्हांला अपेक्षित उमेदवार व पक्ष सत्तेत येईल. हा लेख मी कोणत्याही पक्षाचं अंधभक्त म्हणून लिहलेला नाही. आतापर्यंतची देशाची सत्त्य परिस्थितीचा अभ्यास करून लिहलेला आहे. कोणत्याही पक्षाची बाजू त्यात घेतलेली नाही. म्हणून आपणही कोणत्याही पक्षाचे अंधभक्त बनून, आफवांवर विश्वास न ठेवून देशाच्या भल्यासाठी डोळसपणे मतदान करावे तरच तुमचे आणि देशाचे भले होईल.धन्यवाद.!

सुभाष मासुळे
धुळे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button