ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन यावर्षी ७ टक्क्यांनी घसरविण्याचा बनाव – विठ्ठल राजे पवार यांचा आरोप

महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन यावर्षी ७ टक्क्यांनी घसरविण्याचा बनाव – विठ्ठल राजे पवार यांचा आरोप

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क / वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/9/2024 : एफ आर पी चोरी त्यात एक वरीची शिरजोरी. गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांचा दहा ते बारा हजार कोटी ला खिसा कापला जातो आहे. सरकार मधीले कलम कसाई मात्र डोळे मिटून दुधावरची साय खातेय.! पावसाची तूट, अन्नधान्य महागाई वाढवणे आणि निर्यातीवर परिणाम होणे, यामुळे 2024-25 मध्ये महाराष्ट्राचे साखर उत्पादन 7% घसरण्याचा संघटीत बनावट अंदाज मंत्री समितीने बांधलेला आहे असा आरोप ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य विठ्ठल राजे पवार यांनी केला.


भारतातील साखर उत्पादनापैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त वाटा असलेल्या महाराष्ट्रात 2024-25 पीक वर्षात साखरेच्या उत्पादनात 7% घट होण्याची अपेक्षा मंत्री समितीच्या बैठकीत सांगितलेली आहे कारण गेल्या पावसाळ्यात पावसाच्या कमतरतेमुळे उसाचे उत्पादन कमी झाले आहे, असे जरी सांगितले असले तरी प्रत्यक्षात 110 लाख मीटर उसाचे उत्पादन वाढले आहे.भारतातील साखर उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की 2024-25 मध्ये उत्पादन 102 लाख मेट्रिक टनांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे जे मागील वर्षी 2023-24 मध्ये 110 लाख टन होते. यामुळे अन्नधान्य महागाई वाढू शकते आणि भारतातून साखर निर्यात परावृत्त होऊ शकते., सहकार मंत्रालयाने नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील अंदाजित उत्पादन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडले., महाराष्ट्रातील 2024-25 चा गळीत हंगाम उशीर झाला आहे आणि ऊसाची कमी उपलब्धता आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे 15 नोव्हेंबर नंतर सुरू होण्याची अपेक्षा आहे, तर शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेने यावेळी राज्य सरकारने निवडणुकांमुळे जाणिवपूर्वक गाळप हंगाम पुढे ढकलला आहे, आणि उसाचे उत्पादन 1002 लाख मेट्रिक टन दाखवून, उतारा मात्र केवळ 9.75 टक्के दाखवलेला आहे ही फार मोठी रिकव्हरी चोरी ठरवून केलेली दिसते आहे, शेतकरी संघटना याच्यावरती आवाज उठवेल मात्र साखर कारखानदार 15 नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू झाले आता मात्र साखर कारखान्यांचे नुकसान होणार नाही, साखर कारखानदार मात्र खूडूक झाल्यासारखे चुपचाप आहेत असा प्रति आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
१५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गाळपासाठी ११.६७ लाख हेक्टरमध्ये लागवड केलेला १,००४ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याची विभागाची अपेक्षा आहे., २०२३-२४ मध्ये; 208 साखर कारखान्यांनी 1,076 लाख टनांचे गाळप केले आणि 110.2 लाख टन उत्पादन केले, जे देशात सर्वाधिक आहे, त्यानंतर उत्तर प्रदेशने 103.65 लाख टन उत्पादन केले., लातूर, उस्मानाबाद आणि बीड सह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे लागवडीखालील क्षेत्र १४.३७ लाख हेक्टरवरून ११.६७ लाख हेक्टरवर आले आहे. कोरड्या पावसामुळे पिकावर पडणाऱ्या ताणामुळे उसाच्या उत्पादनात आणि उत्पादकतेतही घट झाली. याचा परिणाम रिकव्हरी रेट (प्रति टन गाळलेल्या उसाचे उत्पादन) 10 च्या खाली येतो. वसुली 9.95% पर्यंत घसरण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होईल, असे सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले., तर संघटनेने यावर त्या अधिकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
2023-24 मध्ये सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील 208 साखर कारखान्यांनी 1076 लाख टन उसाचे गाळप केले आणि 110.2 लाख टन साखरेचे उत्पादन केले. राज्याच्या इतिहासात प्रथमच खाजगी साखर कारखान्यांच्या संख्येने सहकारी कारखान्यांच्या संख्येला 105:103 च्या प्रमाणात मागे टाकले आहे. तर यावर संघटनेने सहकार महर्षींनी सहकार क्षेत्र कोठे नेऊन ठेवले आहे यावर चिंता व्यक्त केली आहे.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी विठ्ठलराजे पवार म्हणाले की, हे प्राथमिक अंदाज असून, प्रत्यक्ष उत्पादन मागील वर्षीच्या बरोबरीचे असेल. “सहकार विभागाने दिलेले अंदाज शेतकऱ्यांची दिशाभूल करनारा आहे आणि उसाचे कमी गाळप आणि 9.75% इतकी 3 % रिकव्हरी कमी दाखवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुटीतून पिळवणूक करणे आहे. गेल्या वर्षी देखील, अंदाजे आकडे 95 लाख टन होते, परंतु वास्तविक उत्पादन 110 लाख टनांपेक्षा जास्तने वाढले होते,” मग 110 लाख,मे.टन इतके उत्पादन कसे वाढले, गाळप हंगाम सुरू करण्या अगोदर मंत्री समितीच्या बैठकीमध्ये आकडेवारी कमी दाखवायची आणि त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ऊस पिक लुटायचं असेही ते म्हणाले की 2017-18 पासून तर गेल्या पाच वर्षात प्रतिवर्षी राज्यातील 35 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दरवर्षी सहा ते सात हजार कोटी रुपयांच्या लुट करायची हे कारस्थान मंत्रालयातील बाबू व व्हिएसआय, साखर संघ, साखर आयुक्तालयातील कलम कसाईंची टोळीने करतात, गेल्या पाच वर्षातील रिकवरी चोरीसह वजन काटे फोडणी वाहतुकीतील फरकातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 22 हजार कोटींपेक्षा अधिकची लूट झालेली आहे तशी लेखी आकडेवारी सह तक्रार राज्याचे व देशाच्या संबंधित खात्याकडे आणि मंत्र्यांकडे केलेली असल्याची माहिती विठ्ठल राजे पवार यांनी द हिंदुस्थान टाइम्स ने ओनलाइन घेतलेल्या मुलाखतीत दिलेली आहे.
ते पुढे म्हणाले की सन 24-25 चे गाळप हंगामासाठी प्रति टन 3650 रुपये साडेनऊ टक्के रिकवरी बेस धरून केंद्र सरकारने फर्स्ट स्केल प्राइज विना कपात शेतकऱ्यांना 14 दिवसाचे अगोदर पेमेंट द्यावे, शुगरकेन कंट्रोल 1966 कायद्याचे तंतोतंत पालनं करावे व व केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन महाराष्ट्र राज्य सरकारचे मंत्री समिती व सरकारने करावे, महाराष्ट्र राज्य सरकारने उसाचे तीन रिकवरीवर, तीन दर केलेले आहेत ते बेकायदेशीर आहे ते तात्काळ मागे घेऊन साडेनऊ टक्के धरून 3650 रुपये प्रति टन जाहीर करावी अन्यथा यावर्षी खाजगी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची लूट थांबवली नाही तर खाजगी साखर कारखानदारी रोखली जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी राज्याच्या संबंधित मंत्री समिती वरती असेल अशी माहिती देखील विठ्ठल राजे पवार यांनी दिलेली आहे. 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली जाईल, मागील पाच वर्षातील शेतकऱ्यांची थकबाकी बेकायदेशीर गाळप केलेली दीड हजार कोटी रुपयांची दंड वसुली सह शेतकऱ्यांची थकीत एफआरपी वरील 15 टक्के व्याज, (आता एफ आर पी नको साडेनऊ टक्के रिकवरी चा बेस रेट द्या.) ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रिकवरी वजन काटे व तोडणी वाहतुकीतील लूट राज्याचे मुख्य सचिव व साखर आयुक्तालयाने थांबवली नाही तर खाजगी साखर कारखाने बंद पाडले जातील असा आसुड मोर्चा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे राज्य व केंद्र सरकार यांना दिला असल्याचे विठ्ठल राजे पवार यांनी पुणे येथून ऑनलाईन दिलेल्या द हिंदुस्थान टाइम्स व इतर पत्रकारांशी बोलताना सांगितले, यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, युवक उपाध्यक्ष राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, अनिल भांडवलकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वर्पे व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button