राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/9/ 2024 :
अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. या रांगोळी स्पर्धेत 20 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धा कृषी संस्कृती, सर्वधर्म-समभाव, पर्यावरण संवर्धन, बेटी बचाओ, रक्तदान- श्रेष्ठदान या विषयावर घेण्यात आल्या.या स्पर्धेचे परीक्षण प्रा. विनायक सूर्यवंशी, डॉ.पल्लवी मिसाळ, प्रा.विजया बागल यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. दत्तात्रय मगर, डॉ.सज्जन पवार , प्रा. स्मिता पाटील आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.