ताज्या घडामोडी

भुजबळांच्या भुजेत भाजप विरोधी बळ ?

भुजबळांच्या भुजेत भाजप विरोधी बळ ?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

दिनांक 29/05/2024 :
आजकाल नाही तर लोकसभा निवडणूकीचे बिगूल वाजायला सुरुवात झाल्यापासून राज्याचे महाभ्रष्ट तुरुंगवासाची शिक्षा भोगून आलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजेत भाजप विरोधी बळ चांगलंच संचारल आहे त्यामुळे ते काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात चांगलेच चेकाळून आपली मुक्ताफळे मुक्तपणे उधाळत होते. काल त्यांनी महायुतीच मिठ खाऊन चक्क इंडिया आघाडीची भलामण करत आघाडीच्या प्रचारातील संविधानाच्या मुद्दाचा भाजपला नक्कीच तोटा होणार असल्याचे सांगत भाजपच्या भुवयातील बळच काढून घेतलं इतकच नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ऐंशी ते नव्वद जागा देण्याची मागणी केली हे नक्की कशाचे द्योतक आहे हेच काही कळत नाही .
याच राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने कारण नसताना खांद्यावर घेतल तेंव्हाच हा पक्ष खांद्यावर घेऊन कानात मुतणारा आहे याची जाणीव सर्वसामान्य लोकांना झाली होती पण देशातील जी -२० चे मालक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनी आपण दोघे गुजराती बाकी सगळे शून्य अशा आविर्भावात आर्थर रोडच्या तुरुंगात जाणाऱ्यांची सोय डायरेक्ट महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात केली , त्याचा हा परिणाम आहे आता म्हणावं भोगा आपल्या कर्माची फळे. छगन भुजबळ हे आतून इतके पोखरले आहेत की त्यांना नाशिकमधून लोकसभेत जायचे होते. पण हा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे खडतर झाला आणि भुजबळांचा डब्बा गुल झाला. तेंव्हा पासून त्यांचा सतत तिळपापड होतो आहे .
छगन भुजबळ यांची स्वतःची औकात काय ? कारण अजूनही ते जामिनावर आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं अन् तसा आपला घसा ताणावा. भुजबळ तर सोडा दस्तूरखुद्द अजितदादा हे सुद्धा जामिनावर आहेत. त्यात पुणे पोलिसांनी त्यांनी गिळलेल्या कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे भाजप कधी आणि कशी पाचर मारेल हे राष्ट्रवादीला कळणार सुद्धा नाही. कारण हा बामणी कावा कळायला प्रफुल्ल पटेल काय किंवा हसन मुश्रीफ काय यांना पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे उगाच उंटाचा मुका घेण्यासाठी स्टुलाचा वापर करून आपल हस करून घेऊ नका. नाहीतर आहेच इडीची छडी ! कारण या छडीच वैशिष्ट्य म्हणजे ‘छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम ‘ असा काहीसा प्रकार आहे.
छगन भुजबळांच वाचाळ बाळंतपण संपत नाही तोच राज्याच्या विकासासाठी चोवीस तास कार्यरत असलेले आणि सतत सत्ता हवी असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तर आजच कुठेतरी वाऱ्यावरच्या वरातीमागून घोड वाहून नेण्यासाठी तत्पर असणाऱ्या पत्रकारांशी बोलताना या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे ब्रह्मदेव आला तरी सांगू शकत नाही अशा पद्धतीचे अकलेचे तारे तोडून आपली राजकीय औकात सिध्द केली असेच म्हणावे लागेल. कारण महाराष्ट्रातील भाजपची सत्ता बळकट करण्यासाठी नाही तर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तना मनातील ‘ अब की बार चारसो पार ‘ हे ब्रीद वाक्य साध्य करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट करत सत्तेत येण्याचं अवतान धाडल ! त्यावेळी अजितदादा यांना ब्रह्मदेव आठवला नाही त्यावेळी त्यांनी निकालाबाबत मीच काय ब्रह्मदेव सुध्दा सांगू शकत नाही हे वाक्य का आठवल नाही. कारण तुम्हाला सत्तेचा मलिदा तर पाहिजे होताच शिवाय तुमच्यासह तुमच्या साथीदारांना इडीची बेडी नको होती म्हणून हा राजकीय बुध्दीबळाचा सारीपाट तुम्ही मांडला. पण लक्षात ठेवा तुम्ही वजीर आहात त्यामुळे सावधगिरीने विधान करा.

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे. मुंबई

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button