ताज्या घडामोडी

अवकाळी पावसातील उपोषणाचा दुसरा दिवस

अवकाळी पावसातील उपोषणाचा दुसरा दिवस

Akluj Vaibhav News Network Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo.,9860959764.

अकलूज दिनांक 28/11/2023 :
माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज येथे दिनांक 24 नोव्हेंबर पासून शासकीय कार्यालयीन वेळेत उपोषणास प्रारंभ झाला आहे.
आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी उपोषणाच्या दुसऱ्या दिवसी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तरीही भर पावसात उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले.
माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट अविनाश टी. काले, पत्रकार संघाचे सचिव नागनाथ बाबुराव साळुंखे या उपोषणकर्त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे भ्रष्ट आचरणाविरुद्ध उपोषण सुरू केलेले आहे. या संदर्भातील रीतसर लेखी तक्रार उपोषणकर्त्यांनी राज्य परिवहन आयुक्त मुंबई, महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे दाखल केलेली आहे. या कारवाईला गती यावी व उपरोक्त खात्यांच्या वरिष्ठ पातळीवरून कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

भर पावसातील राजकीय सभेने राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणला. त्याप्रमाणे पत्रकारांचे हे उपोषण भर पावसात सुरू असल्याने जनहिताच्या प्रश्नाची सोडवणूक नक्कीच होणार आणि यातील भ्रष्ट आचरण करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचेवर निश्चितच परिणाम होऊन होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीतून जनतेची मुक्तता होणार अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.
ऐनवेळी आलेल्या या पावसाने मात्र उपोषणकर्त्यांची पूरती तारांबळच उडविली. दरम्यानच्या काळात स्वतः भिजत येऊन पत्रकारांसाठी पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून एक छत्री आणि दोन प्लास्टिकच्या घोणच्या आणि वरती बांधण्यासाठी छोटेस्या छताची सोय केली. तोपर्यंत उपोषणकर्त्यांनी उपोषणाच्या बॅनरचा उपयोग पावसापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने कवटीच्या झाडास बांधून अल्पसे अच्छादन बनविले होते. परंतु तोपर्यंत उपोषण कर्ते पावसात चिंब भिजून गेले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button