ताज्या घडामोडी

अकलूजच्या चार डॉक्टरांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

अकलूजच्या चार डॉक्टरांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 06/01/2024 :
अकलूजमधील वैद्यकिय क्षेत्रात नावाजलेल्या चार डॉक्टरांनी पैशांच्या देण्या घेण्यावरून विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याअनुषंगाने सदर डॉक्टरांनी माळशिरस न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना तात्पुरता ९ तारखेपर्यंत जामिन मंजुर करण्यात आला आहे. या घटनेने अकलूज वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अकलूज पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनूसार पिडीत महिला ही अकलूज येथील अकलाई हॉस्पिटल येथे काम करत होती. तिने उच्च शिक्षणासाठी ३५ हजार रूपये हॉस्पिटलकडून घेतले होते. ते पैसे पगारातून वजा करावेत अशी विनंती सदर पिडीत महिलेने हॉस्पिटलकडे केली होती. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण भारत चंकेश्वरा, डॉ. सुनिल सुभाष नरूटे, डॉ. शैलेश भानुदास गायकवाड व डॉ. सचिन सावंत सर्व रा. अकलूज यांनी उसने दिलेले पैसे पगारातून न फेड करता तु आमच्याशी शारीरीक संबंध ठेव अशी त्या महिलेलेकडे मागणी करून फेब्रुवारी 2022 ते 28 जुन 2023 दरम्यान अकलाई हॉस्पिटलच्या डॉक्टर रूममध्ये सदर महिलेवर वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद पिडीतेने अकलूज पोलीस ठाण्यात दि. 3 जानेवारी 2024 रोजी दिली. त्यावरून अकलूज पोलीसांनी चौघा डॉक्टरां विरोधात गु. र. नं. १०/२४, भादवि. ३७६/२, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सर्व डॉक्टरांनी गुन्हा दाखल होण्यापुर्वीच दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी माळशिरस न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता त्याच दिवशी सुनावणी होऊन न्यायालयाने सर्व डॉक्टरांना अंतिम सुनावणी दि. ९ जानेवारी होइपर्यंत तात्पुरता जामिन मंजुर केला असल्याची माहिती अकलूज पोलीसांनी दिली.
वास्तविक पाहता या प्रकरणाचे पदर वेगवेगळे आहेत. या अनुषंगाने 35 लाखाच्या प्रकरणाचे पडसाद प्रसिद्धी माध्यमातून यापूर्वी उमटलेले आहेत. रुग्णांच्या हाताला लावलेल्या सलाईनची सुई आणि बँडेज हे रुग्णावर केलेल्या उपचाराच्या पूर्ण बिलाच्या पूर्तते शिवाय कधीच काढण्याची तसदी दवाखान्यात घेतली जात नाही. असे असतानाही 35 लाख रुपयांचे गौड बंगाल नेमके काय असेल? याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. हे काहीही असले तरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशी घटना निश्चितच वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारीच आहे.अशी चर्चा सुजाण नागरिकांतून होत आहे. अशा ठराविक गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यामध्ये होऊन सुद्धा प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्याचे काम हल्ली वारंवार पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कृतीबाबत पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्याचा हेतू निश्चितच शुद्ध नाही. पोलीस स्टेशन समोर आत्महत्या प्रकरण होऊनही सदर बाबतीत आत्महत्या म्हणून नोंद होत नाही. हे उघड गुपित बरेच काही सांगून जातेय.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button