ताज्या घडामोडी

रत्नत्रय मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

रत्नत्रय मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Akluj Vaibhav News Network.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 23/07/2024 :

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचालित रत्नत्रय प्री- प्रायमरी स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहीगांव मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव सोमवारी दिनांक 22 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मुलांचे हस्ते आई वडिलांचे पूजन, वंदनाने करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कृतज्ञ पूर्वक वंदन करण्यात आले.
“प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु हा त्याची आई असते. त्यानंतर विविध गुरु त्याच्या आयुष्यात येतात. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारांमुळे माणूस घडतो. विद्यार्थ्याच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच शिक्षकांचा देखील असतो ” असे मत मुख्याध्यापक सतीश हांगे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.या वेळी हर्ष चिकणे व पूजा चव्हाण यांनी भाषणातून गुरूंचे महत्व सांगितले. सदर प्रसंगी बापू किर्दक व सौ. कोमल किर्दक दत्ता सावंत व सौ.सीमा सावंत, गणेश चिकणे व सौ. प्रियंका चिकणे, योगिराज चिकणे व सौ. सुरेखा चिकणे, गणेश देवकर व सौ. रूपाली देवकर, शंकर खंडागळे,अंकुश गोडसे, आय. टी. आय. चे प्राचार्य गजेश जगताप, मुख्याध्यापक सतीश हांगे, बरडकर, गणेश खंडागळे, शिवराम नाळे, स्नेहल थोरात , पूजा चव्हाण ,सुभाष शिरतोडे,आगतराव किर्दक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल थोरात यांनी तर आभार प्रदर्शन गजेश जगताप यांनी केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.