ताज्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस ट्रिपल सेंच्युरी करतील

देवेंद्र फडणवीस ट्रिपल सेंच्युरी करतील

Akluj Vaibhav News Network.

🔰 संकलन आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 22/07/2024 :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग तीन वेळा क्रिकेटच्या पंढरीत म्हणजे इंग्लंडच्या लॉर्डस मैदानावर तिन्ही कसोटी मालिकेत सलग तीन शतके म्हणजे ट्रिपल सेंच्युरी करण्याची अफलातून कामगिरी कर्नल दिलीप बळवंत वेंगसरकर यांनी केली होती तो क्रिकेटमधील विक्रम अद्यापही अबाधित आहे , अगदी तसाच अनोखा विक्रम महाराष्ट्रातील राजकारणात सध्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे महाराष्ट्रातील वाकबगार नेते देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या नावावर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होईल यात काही शंका नाही .
शेषराव वानखेडे , सध्याचे जगविख्यात कायदेतज्ज्ञ हरिष साळवे यांचे पिताश्री एन.के.पी .साळवे अथवा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्यासह अनेक राजकारणी क्रिकेटचा गंध नसताना क्रिकेट संघटनेत झोल करत होते व यापैकी काहीजण आजही करतात यात काही नवीन नाही अर्थात त्याला कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता अपवाद नाही , त्यामुळेच तर क्रिकेट आणि राजकारण याची सांगड मला या लेखातून घालता आली , त्यातच काल देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजपच्या राज्यस्तरीय विस्तीर्ण मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यापुढे सर्वांनी आता मैदानात उतरून जोरदार बॅटिंग करताना मागेपुढे पाहत बसू नये किंवा कोणाच्याही आदेशाची वाट पाहत न बसता फक्त हिट विकेट किंवा सेल्फ गोल करू नये इतकी माफक अपेक्षा व्यक्त केली .
शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब हे महाराष्ट्राचे चार वेळा तर विलासराव देशमुख तीन वेळा मुख्यमंत्री राहिले पण त्यांना त्यांच्या कार्यकाळात कधीच एकदाही स्वपक्षाला शंभरीचा आकडा पार करून सत्ता मिळवता आली नाही , कारण त्यांना निवडणूकीनंतर होणारी सौदेबाजी करण्यात फारच मर्दुमुखी गाजवायची हौस होती किंवा स्वबळावर स्वपक्षीय आमदारांची शंभरी गाठणं त्यांच्या औकातीत सोडा तर कुवतीबाहेर होतं हे आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार सिध्द झाले आहे .
पण हिचं कामगिरी सलग दोन वेळा क्रिकेटच्या भाषेत जसा गुंडाप्पा विश्वनाथ लेट कटद्वारे लिलया जादुई चौकार मारत असे अगदी तशीच अभूती देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सलग दोन निवडणुकीत एकदा एकशे बावीस तर एकदा एकशे पाच अशी स्वबळावर स्वपक्षीय आमदारांची शंभरी पार केली आहे आता यंदाच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ते आमदारांची ट्रिपल सेंच्युरी करतील यात माझ्या मनात काही शंका नाही मग यात कोणतही भैताड मध्ये घुसलं तरी त्याची घुसखोरी औटघटकेची ठरणार यात काही शंका नाही , अर्थात हे जे नवीन भैताड आहे ते राजकारणात चोची मारुन चंचू प्रवेश करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे ते भैताड नक्की कोण आहे हे मला सांगण्याची अजिबात गरज नाही .
ज्यावेळी आपणा सर्वांच्या बुध्दीची टरपल उडतात तेंव्हा राजकीय नेत्यांच्या बुध्दी कवाडे उघडतात म्हणून त्यांना राजकारणी म्हणतात कारण राजकारण हा काय विटी दांडूचा खेळ नाही की हातात दांडू दिला की विटी कोसावर जाऊन पडली , तर राजकीय नेते राजरोसपणे कुणा ना कुणाची विटी करतात पण ती दुसऱ्याच्या दांडूने त्यामुळे त्यांचा दांडू आणि ते सही सलामत असतात यात देवेंद्र फडणवीस हे माहिर आहेत , अहो त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय दिवसाढवळ्या विटी केली की बघता बघता या दोन्ही पक्षांची दोन शकलं झाली त्यामुळे त्या भैताडाच काय घेऊन बसलात , आता कालच्या भाजपच्या मेळाव्यात ज्या जोशात आणि तितक्याच जोमात देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून जे बळ दिले ते बळ घेऊन कार्यकर्ता खरोखरच कामाला लागला तर शिल्लक शिवसेना काय किंवा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस काय यांच नामोनिशाण सुध्दा राहणार नाही अर्थात त्यांना भाजपच्या नेत्यांनी तितकंच बळ आणि प्रेम दिलं पाहिजे नाहीतर नेते उंटावर बसून शेळ्या हाकणार असतील तर भाजपची वंचित आघाडी व्हायला वेळ लागणार नाही हेही तितकंच खरं आहे.

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.