ताज्या घडामोडी

शासनाच्या जाचक अटींमुळे धनगर वाड्यावरील लोकांचे जगणं मुश्किल – संजय वाघमोडे ♦️एक वही समाज बांधवासाठी.. या उपक्रमार्तगत आजरा तालुक्यातील १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

💢शासनाच्या जाचक अटींमुळे धनगर वाड्यावरील लोकांचे जगणं मुश्किलसंजय वाघमोडे

♦️एक वही समाज बांधवासाठी.. या उपक्रमार्तगत आजरा तालुक्यातील १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Akluj Vaibhav News Network.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 22/07/2024 :

शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आणि वन विभागाच्या अडमुठेपणामुळे धनगर वाड्यावरील लोकांचे जगणं मुश्किल झाले आहे असे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी म्हटले. ते “एक वही समाज बांधवांसाठी, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी” या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आवंडी विद्यामंदिर शाळा नं १ येथे शैक्षणिक साहित्य वाटप आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बी आर सी चे नामदेव माने,आवंडी नं १ चे मुख्याध्यापक सोन्ने, ३ नं चे कोकरे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले धनगरवाडे सह्याद्रीच्या कुशीत आणि जंगल हद्दीत हजारो वर्षापासून आहेत त्यांना आज पर्यंतच्या राजे महाराजे इंग्रज या सत्ताधाऱ्यांनी संरक्षण दिले राजेशाही मोगलाई किंवा इंग्रजांच्या काळात ही त्यांच्या स्वातंत्र्याला कधी धक्का लागला नव्हता जंगलामधील वाळलेली लाकडे करवंद जांभळे यासारखे रानमेवा विकून धनगर बांधव उदरनिर्वाह करायचे वाळलेल्या झाडांच्या फांद्या गोळा करून मोळी बांधून महिलां 30, 40 किलोमीटर चालत जाऊन शहरात विकुण त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर संसार चालवायचे. परंतु देश स्वतंत्र झाला आणि धनगरवाडे मात्र पारतंत्र्यात गेले.आजही अनेक धनगरवाडे वनहद्दीत असल्याने वन अधिकारी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देतात. तिथे रस्ते आरोग्य शिक्षण यासारख्या मुलभूत सुविधा ही पोहचलेल्या नाहीत.. पाळीव जनावरे वन्यप्राण्यांनी मारले तर नुकसान भरपाई देण्याचे टाळतात. वाळलेल्या फांद्या गोळा करून ठेवल्या तर त्या पेटवून देतात. रानमेवा गोळा करू देत नाहीत. यामुळे धनगर वाड्यावरील लोकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. याला वैतागून अनेक लोक धनगरवाडे सोडून निघून जात आहेत. त्यामुळे धनगरवाडे ओस पडायला लागलेले आहेत. धनगर वाड्यावरील धनगर बांधव गेले कुठे हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. असेही त्यांनी सांगितले.


सोन्ने बोलताना म्हणाले संजय वाघमोडे यांनी सुरू केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे. वाघमोडे धनगर वाड्यावरील समाज बांधवाशी चर्चा करून त्यांना अडीअडचणी मदत करुन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात.
बी आर सीचे नामदेव माने म्हणाले की वरिष्ठांच्या सूचनेनुसार आज सकाळपासून संजय वाघमोडे यांच्यासोबत आहे. धनगर वाड्यावरील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणूनच ते विद्यार्थ्यांना गेले दहा वर्ष एक वही समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण अर्धवट सोडायला लागू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर ते धनगर वाड्यावरील आपल्या बांधवांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करतात.खरंच हा उपक्रम अगदी नाविन्यपूर्ण असून विद्यार्थ्यांच्या साठी अतिशय नाविन्यपूर्ण आहे. मिळालेल्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण करावे.
यावेळी यशवंत क्रांती चे जगन्नाथ कोकरे, ज्ञानदेव फाले, बीआरसीचे नामदेव माने, अरविंद कापसे, तुकाराम तरडेकर, मुनाप उत्तरकर, शामराव गुरव राजाराम नाईक सोन्नै,इ.शिक्षकवृद,सुनिता बाबु गावडे,लक्ष्मी गंगाराम गावडे,सरिता रामचंद्र गावडे,कमल़ कोकरे, मंगल येडगे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.