ताज्या घडामोडी

समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान

समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान

Akluj Vaibhav News Network.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 15/07/2024 :

एन.यु.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली, महाराष्ट्र राज्य संपर्क व राज्य प्रसिद्धीप्रमुख, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (संस्थापक संपादक साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि अकलूज वैभव डॉट इन (aklujvaibhav.in) यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात नुकत्याच संपन्न झालेल्या एनयूबीसी आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये महत्वपूर्ण योगदानाद्वारे महाराष्ट्राची मान उंचावण्याचे कार्य “एक समाजसेवक” या नात्याने यशस्वीपणे बजावले. त्यानिमित्त त्यांचा नाशिक, लातूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतकांनी अकलूज येथे आज दिनांक 15 जुलै रोजी भेट घेऊन त्यांचा सन्मान केला.तर WDSO अर्थात वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय समन्वयक सखाराम खोत यांनी भ्रमणध्वनी वरून अभिनंदन केले.
याप्रसंगी टिपलेल्या पहिल्या छायाचित्रात W.D.S.O. अर्थात वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समितीचे राष्ट्रीय चेअरमन व ज्येष्ठ पत्रकार नायकुडे यांचा सन्मान करताना साहित्य क्षेत्रातील दिग्गज पुस्तक मुखपृष्ठ परीक्षक प्रशांत शहादू वाघ (येवला नाशिक), इंजिनियर फारूख मौलासाब शेख (लातूर), अमोल शिवाजी रिकिबे(टणू नरसिंहपूर) आणि नवनाथ महादेव जगताप(टणू नरसिंहपूर) इत्यादी मान्यवर दिसत आहेत.

दुसरे छायाचित्र : सन्मान सोहळ्यानंतर चहापान प्रसंगी टिपलेला आठवणीतील विरंगुळ्याचा एक क्षण!

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.