ताज्या घडामोडी

लाखो वैष्णवांच्या मेळ्यात अकलूजच्या “ताहेरा फाउंडेशन” ने जपली सामाजिक बांधिलकी

लाखो वैष्णवांच्या मेळ्यात अकलूजच्या “ताहेरा फाउंडेशन” ने जपली सामाजिक बांधिलकी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 13/07/2024 :

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूज येथील तमाम नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केल्यानंतर अकलूज येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या “ताहेरा फाउंडेशन” च्या वतीने “आनंदयात्री” जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या वारकरी संप्रदायाला उन आणि पावसाने संरक्षण व्हावे या साठी श्रीमती विजया सुधाकर पंधे यांच्या हस्ते “छत्री” वाटप करण्यात आले.
प्रारंभी उद्योगपती श्री व सौ संतोष सुधाकर पंधे तसेच श्री व सौ दिलीप किसनराव होनमाने या उभय्यंता च्या हस्ते “श्री” ची आरती करण्यात आली.


अकलूज – माळीनगर रोड येथील श्री गणेश मोटर्स येथे पुणे जिल्ह्यातुन आलेल्या वारकरी संप्रदायाची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दिंडी चे प्रमुख ह.भ.प.नारायण खेसे महाराज, संगम येथील उद्योगपती संतोष सुधाकर पंधे, धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज अध्यक्ष दिलीप होनमाने, “ताहेरा फाउंडेशन” चे सर्वेसर्वा हाजी अबुबकर तांबोळी, टाइम्स 9 न्यूज नेटवर्क चे संपादक नौशाद मुलाणी,अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्या सह असंख्य वैष्णव बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड स्वप्नील होनमाने, वाहतूक संघटनेचे छगनराव निचळ, संतोष रंदवे, अमोल घुले, रवी सोनवणे, कामिल शेख यांनी परिश्रम घेतले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.