ताज्या घडामोडी

लय भारी.. रत्नत्रयची वारी

लय भारी.. रत्नत्रयची वारी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 13/07/2024 :

विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकावी तुक्याचे अभंग
नाम गजरात होऊ दंग
पोथी पाण्यात कशी तरली
विठ्ठल नामाची शाळा भरली*
याची देही, याची डोळा ,
पहावा रत्नत्रय बालदिंडीचा सोहळा
सदाशिवनगरी रत्नत्रयच्या वारकऱ्यांनी अक्षरशः फुललेली, अतिशय उत्साहामध्ये, सर्व तहान, भूक विसरून ,माऊलींच्या जयघोषात रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व जुनिअर कॉलेज, मांडवे येथील बालदिंडीची प्रसन्नमय सुरुवात झाली ,नयनतृप्त करणारा अविस्मरणीय असा सोहळा, विठ्ठल , रुक्मिणी ,तुकाराम, ज्ञानेश्वर ,सोपान, जनाई, मुक्ताई आणि वारकरी अशी अतिशय सुंदर वेशभूषा करून आलेले बाल वारकरी, ढोल, ताशा,हलगी आणि लेझीमच्या गजरात, अश्वाच्या साथीने हाती विजय पताका घेऊन, तुकारामांची दिंडी नं 1, ज्ञानेश्वरांची दिंडीनं 2 , नामदेवांची दिंडी नं 3, मुक्ताबाईंची दिंडी नं 4 अशा अनुक्रमांकाने अतिशय शिस्तीत, भक्तीचे भुकेले वारकरी विठ्ठल भेटीसाठी , मनामध्ये भक्तीचा भाव आणि मुखामध्ये माऊलींचे नाव घेऊन निघाले रत्नत्रय पंतसंस्था. सदाशिवनगर पासून या वारीची सुरुवात झाली , दिंडीच्या या वाटेवर वारकऱ्यांना पाणी व खाऊ वाटप करण्यात आले टाळ्यांचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी रत्नत्रय स्कूलच्या भव्य अशा मैदानावर पोहोचली, मैदानात माऊलींचे आगमन होताच सर्व बाल वारकऱ्यांनी गोल रिंगण केले आणि माऊलींच्या आश्वाचा गोल रिंगण सोहळा पार पडला.


या दिंडीमध्ये 750शे. पेक्षा जास्त विद्यार्थी, 200शे ते 250शे पालक, बहुसंख्येने ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , अशा हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते. अतिशय भक्तीमय वातावरणामध्ये वारीचा हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी उपस्थित , संस्थेचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी, मार्गदर्शक वीरकुमार दोशी, सचिव प्रमोद दोशी, बबन गोपणे, सुरेश धाईंजे, अभिजीत दोशी, बाहुबली दोशी , अजय गांधी , तुषार गांधी, वैभव शहा, प्रितम दोशी रमेश जमदाडे, रवींद्र कुलकर्णी,तनोश शहा , ज्ञानेश राऊत, वैभव मोडासे ,सतीश बनकर ,पुनम दोशी ,सारिका राऊत, स्वाती बनकर व इतर सर्व कमिटी मेंबर्स, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.