ताज्या घडामोडी

अजितदादांच्या मनात भाजपचा गेम प्लॅन करायचाय ?

अजितदादांच्या मनात भाजपचा गेम प्लॅन करायचाय ?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

मुंबई दिनांक 25/06/2024 :
जे राज्याचे ओढूनताणून उपमुख्यमंत्री झालेत किंवा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नामशेष होण्याच्या दृष्टीने या पदावर बसवलं पण त्याचा राजकीय लाभ ना भाजपला झाला ना दस्तूरखुद्द अजितदादा यांना याचा अधिक मनस्ताप झाला कारण हातातल तुपही , तेलही आणि हातात भलतंच धुपाटणे आले कारण शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी आपल्या सूनेचा म्हणजे पुतण्या अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई पवार यांचा आपल्या कन्येकरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा वरचढ मताधिक्याने बारामती लोकसभा मतदारसंघातून लाजीरवाणा पराभव केला .
याचा अर्थ बाप हा बाप असतो वेळ आली तर तो इतका कठोर होतो की त्यावेळी तो कोणतीही क्षमायाचना मागत असताना सख्ख्या मुलाचा तर निर्दयपणे खून करू शकतो इथे तर पुतण्याचा राजकीय बळी द्यायला तो थोडीच मागे पुढे पाहणार आहे .
कारण या बापाकडे त्या पुतण्यासह सगळ्यांच्या कुंडल्या असतात कारण तो आपलं बारस जेवलेला असतो त्यामुळे नव्हे तर त्या कुंडल्यातील कोणते ग्रह कोणत्या राशीत राहू केतू प्रमाणे बापाच्या पाचवीला पुजले आहेत याची लहानपणापासून त्याच बापाला कल्पना असते म्हणून म्हणतात बाळाचे पाय किती दिसतात त्यापेक्षा ते किती वळवळतात , अगदी तसाच निखालस प्रकार शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्या बाबतीत घडला , अर्थात सर्व कौटुंबिक जीवघेणा कलह वयाच्या चौऱ्याऐंशीत साहेबांनी असा काय लिलया हाताळत महाराष्ट्रातील अख्खी लोकसभा निवडणूक स्वबळावर पाच सहा पक्षांना अगदी कमी जागा लढवत म्हणजे तंतोतंत दहा जागी नवशिक्या उमेदवारांच्या पाठबळावर आठ जागा जिंकून डाव्या बगलेत कशा घातल्या हे राजकीय चातुर्य आहे .
त्यामुळेच मी म्हणतो साहेब म्हणजे राजकारणातले बापच , बाप घरातला असो की राजकारणातला , बाप दोन्ही बाप एकच असतात कारण ते जन्म देण्यापासून त्या बाळाच एकदी वयाच्या तिशी पर्यंत पालनपोषण करतात पण तोच बाप ज्यावेळी त्याच मुलाबाळांकडून विविधांगी अडचणीत आणल्या जातात त्यावेळी त्याची कुचंबणा होते , तरीही तोच बाप ऐनवेळी ऐनकेन प्रकारे त्याला धीर देण्यासाठी तो सर्वात पुढे सरसावला असतो याची जाणीव ज्यावेळी अजितदादा पवार यांना झाली त्यावेळी त्यांच्या अश्रूंच्या बांधावर ‘कोणाला पाणी आडवारे अन् धरण भरा रे ‘ अशी मिश्किल सुचली नाही म्हणून कुणाला मानवी पुल बांधता आला नाही .
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे , भाऊबंदकी भाऊबंदकीच्या ठिकाणी राहिली पाहिजे ‘ पण ज्यावेळी तुझी माय माझी होते त्यावेळीच काळजाचा एकोपा होतो ‘ , नाहीतर जर
लहानाची मोठी केलेली मूल ज्यावेळी त्या माऊलीच्या कधीच डोळ्यात डोळा घालून बघत नाही कारण त्या नात्यागोत्यांना कधीच पुर्णविराम मिळालेला असतो , अर्थात हे सर्व सांगण्याचा तात्पर्य काय तर प्रत्येक माणसाला त्याच्या वयानुसार लिंगभेद विसरून यथोचित सन्मान द्या बघा तुमचे सहाच महिने किती प्रगतीचे असतील नाहीतर अनेक महाभाग असे ‘ पदरी पडले अन् पवित्र झाले ‘ की जवळच्या नातेवाईकांना स्वतःच्या हितासाठी त्यांच संभाषण तोडण्यात त्यामुळे स्वार्थपणात सातत्याने गर्क असतात मग त्यातून दुसर काय फलीत होणार , पण पवार कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत तस अजिबात होणार नाही कारण ‘बाप अभी जिंदा दिल है ‘ !

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

 

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.