ताज्या घडामोडी

विलास देवमोरे यांना वन विभागाकाकडून मिळाली १५५००/- रु. नुकसान भरपाई

विलास देवमोरे यांना वन विभागाकाकडून मिळाली १५५००/- रु. नुकसान भरपाई

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 23/06/2024 :

वन्यप्राण्यांच्या हल्यात ठार झालेल्या शेळ्यांची नुकसान भरपाई म्हणून वन विभागाकाकडून विलास देवमोरे यांना १५५००/- रुपये आर्थिक मदत देण्यात आली. नुकसान भरपाई मिळावी म्हणून यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा संजय वाघमोडे यांनी केला होता.
याबाबत माहिती अशी कि कुंभोज ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील विलास देवमोरे व त्यांच्या पत्नी मालु विलास देवमोरे या वयस्कर असून चर्मकार समाजातील आहेत. कुंभोज गावापासून पाच ते सहा किलोमीटरवर बाबू जमाल डोंगर परिसरात असणाऱ्या शेतात वस्ती करून राहत आहेत. त्यांचा मुलगा हा आपल्या बायका मुलासह कुंभोज गावात राहत असतो. शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान तरस सदृश्य चार-पाच प्राण्यांनी वस्तीवर हल्ला करून सहा शेळ्यांना ठार केले. वस्तीवर लाईट नसल्यामुळे संपूर्ण अंधार होता शेळ्यांचा आवाज ऐकून वयस्कर आजी बाहेर येत असताना वन्यप्राणी त्यांच्या अंगावरती धावून जाऊ लागले म्हणून त्यांनी घाबरून घराचा दरवाजा बंद केला व आतूनच आरडाओरडा सुरू केला परंतु जवळ वस्ती नसल्याने व त्यांच्याजवळ फोनही नसल्यामुळे ही घटना कोणाला समजली नाही. या घटनेत मोठ्या दोन शेळ्या व तीन महिन्याची चार पिल्ले वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाली. उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या शेळ्याच वन्य प्राण्यांनी ठार केल्यामुळे आत्ता यापुढे जगायचं कसं ? हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता हि घटना घडल्यानंतर यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन विलास देवमोरे यांना नुकसान भरपाई म्हणून पंधरा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. नुकसान भरपाई मिळाल्याने देवमोरे कुटुंबाने संघटनेचे व वनविभाग व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, शिरोळ तालुकाध्यक्ष दादासो गावडे, पिंटू गावडे, जिल्हा संघटक करवीर परिक्षेत्र अधिकारी कांबळे साहेब,पशुवैद्यकीय अधिकारी एन डी खराडे, वनरक्षक शिवाजी पडियार, संजय आचलारे, लहू भंडारी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.