ताज्या घडामोडी

विजयदादांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर साखर कारखाना येथे ‘ऊस पीक परिसंवाद व चर्चा सत्र’ संपन्न

विजयदादांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर साखर कारखाना येथे ‘ऊस पीक परिसंवाद व चर्चा सत्र’ संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11/06/2024 :
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर येथे दि. 11 जून रोजी ‘ऊस पीक परिसंवाद व चर्चा सत्र’ संपन्न झाले. कार्यक्रमाचे उदघाट्न कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व विधानपरिषद आमदार तथा श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

प्रारंभीच माढा लोकसभेचे खासदार. धैर्यशिल मोहिते पाटील यांचा सन्मान श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कृषिरत्न, कृषिभूषण, शेतीनिष्ट पुरस्काराने सन्मानित असलेले डॉ. संजीव माने यांनी “ऊस लागवड, तणाचा बंदोबस्त खतमात्रा, रोग व कीड नियंत्रण खोडवा संगोपन” या विषयावर व प्रमुख कृषि विद्या विभाग नेटाफेम इरिगेटर्स इंडिया प्रा. लि. चे अरुण देशमुख यांनी, “ऊस पीक पाणी व्यवस्थापन व ठिबक सिंचन काळाची गरज” या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी श्री शंकर सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन ॲड मिलिंद कुलकर्णी, संचालक बाबाराजे देशमुख, सहकार महर्षि कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन प्रकाश पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, एन यु बी सी अर्थात राष्ट्रीय ओबीसी आयोग दिल्लीचे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, रवि पाटील, कृ. बा. स. उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पं. स. माजी उपसभापती प्रतापराव पाटील, जि. प. सदस्य अरुण तोडकर, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, विकास कोळेकर, माजी पं. स. सदस्य. बाळासाहेब लवटे, सहकार महर्षि कारखान्याचे संचालक धनंजय सावंत, गोविंदभाऊ पवार, शिवामृत दूध संघांचे संचालक सचिन रणवरे, आप्पासाहेब रूपणवर, तसेच कारखान्याचे आजी माजी संचालक, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, सर्व खातेप्रमुख, शेतकरी सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.