ताज्या घडामोडी

श्री शंकर सहकारी साखर कारखाना येथे ऊस पीक परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन

श्री शंकर सहकारी साखर कारखाना येथे ऊस पीक परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 10/06/2024 :
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस पीक परिसंवाद व चर्चासत्र आयोजित केले आहे. मंगळवार दिनांक 11 जून रोजी दुपारी दोन वाजता होणाऱ्या परिसंवाद व चर्चा सत्राचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील शुभहस्ते आणि सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे अध्यक्षतेखाली तर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि नवनिर्वाचित खासदार धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. यामध्ये ऊस लागवड, तणांचा बंदोबस्त, खत मात्रा, रोग व कीड नियंत्रण, खोडवा संगोपन या विषयावर कृषी भूषण डॉक्टर संजीव माने आणि ऊस पीक पाणी व्यवस्थापन व ठिबक सिंचन काळाची गरज या विषयावर कृषी विद्या विभाग नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि.चे प्रमुख अरुण देशमुख हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितली.
तरी या ऊस पीक परिसंवाद व चर्चासत्रा चा लाभ सर्व सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजीत डुबल यांनी केले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.