ताज्या घडामोडी

“शिवरत्न”वर विजयी आनंदोत्सव जल्लोषात

“शिवरत्न”वर विजयी आनंदोत्सव जल्लोषात

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई : फटाक्यांच्या आतषबाजीत व गुलाल व फुलांची मुक्त उधळण करीत हलगीच्या कडकडाटात डॉल्बीच्या विविध गाण्यांवर ठेका धरत शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजयी आनंदोत्सव साजरा केला.माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्या फेरीपासून मविआचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मताधिक्य मिळविले. मतदान मतमोजणी जसजशी पुढे जाऊ लागली तसतशे मताधिक्य वाढत गेले तसतसे माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शिवरत्नकडे येण्यास सुरुवात केली. यावेळी शिवरत्नवर उपस्थित विजयसिंह मोहिते पाटील यांचा फेटा हार व गुलाल लावून सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
अठराव्या फेरीत सुमारे ४८ हजाराचे लीड घेतल्याने विजय निश्चित मानत उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली. हलगीच्या कडकडाटात व विविध गाण्यांवर ठेका धरत विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. शिवरत्नवर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी करीत हलगीच्या कडकडाटात व गुलालाची मुक्त उधळण करत नवनिर्वाचित खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या विजयाचा विजयोत्सव साजरा केला. यावेळी नंदिनीदेवी मोहिते पाटील व महिला सदस्यांनी जेसीबीतून गुलालाची मुक्त उधळण केली.


🟢वरूण राजाचीही हजेरी…
अकलूज व परिसरात तसेच शिवरत्न बंगल्यावर विजयाचा जल्लोष चालू असताना पावसाच्या हलक्याशा सरीने हजेरी लावली. पडत्या पावसामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

🟠’शिवराईवाड्या’वर शुभेच्छांसाठी अभूतपूर्व गर्दी

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडल्यानंतर माढा लोकसभेचे विजयी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना अकलूजकडे येण्यासाठी मध्यरात्र झाली. अकलूज मधील चौका चौकात व शिवरत्न बंगल्यावर अनेक कार्यकर्ते भर पावसातही त्यांची वाट पाहत होते. तर अनेकांनी दुसऱ्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी येणे पसंत केले‌. माढा मतदारसंघातील सर्व तालुक्यातील अनेक दिग्गज नेते शुभेच्छा देण्यासाठी “शिवराई” वाड्यावर आले होते.

🟡पंचवीस जेसीबी,३ टन फुले तर २ टन गुलाल :

नूतन खासदारांचे स्वागत करण्यासाठी जेसीबी मालक संघटनेने जय्यत तयारी केली होती.
विजयसिंह मोहिते पाटील‌ क्रीडा संकुल येथे जेसीबी मालक संघटेनेने सुमारे २५ जेसीबीतुन ३ टन फुलांच्या पाकळ्या आणि २ टन गुलालाची मुक्तपणे उधळण तसेच फटाक्यांची नयनरम्य आकर्षक आतषबाजी करीत स्वागत केले.

🟣५३ दिवस अनवाणी फिरलेल्या महेश लोखंडेंचा सन्मान

धैर्यशील मोहिते पाटील खासदार व्हावे अशी मनोमन इच्छा बाळगून असलेल्या धोंडेवाडी ता.पंढरपूर येथील महेश कृष्णा लोखंडे या कार्यकर्त्याने मोहिते पाटलांच्या वाढदिवशी (१३ एप्रिल) रोजी, जोपर्यंत धैर्यशील मोहिते पाटील खासदार होत नाही तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला होता. चप्पल त्याग केली व ऐन कडक उन्हाळ्यात चक्क ५३ दिवस अनवाणी राहून प्रार्थना केली.
धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आल्या नंतर त्यांचा हा त्याग व समर्पण पाहून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी लोखंडे यांना नवीन चप्पल व पुर्ण पोषाख भेट दिला. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
🔵अकलूजमध्येही दिवाळी…
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजया निमित्त अकलूज मध्ये ठीक ठिकाणी गुलालाची मुक्त उधळण करीत फटाक्याचे आतिशबाजीत अधिकारी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

 

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.