ताज्या घडामोडी

दिसेल तिथे असाल तर रहाल अन् नाही राहिलात तर घसराल

दिसेल तिथे असाल तर रहाल अन् नाही राहिलात तर घसराल

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

मुंबई दिनांक 10/06/2024 :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपला तिसऱ्यांदा पदाचा कार्यभार स्वीकारला पण त्यामुळे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांची किंचीत सुध्दा बरोबरी करु शकत नाही. कारण नेहरूंनी तिसऱ्यांदा बहुमत मिळवताना दोन तृतियांश बहुमत घेतल होत किंवा त्यावेळच्या चाच्या नेहरुंच्या मतदारांनी त्यांना दिलं होतं , आता मतदारच चाच्या चाच्या झाल्याने ते अजिबात शक्य नाही कारण महाराष्ट्रातील या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाची इतकी चाकरी केली यात सत्यता आहे का आहे का नाही ? कारण त्या भिवंडीत निवडून आलेल्या खासदार सौभाग्यवती शोभाताई यांनी कुणाच्या मौलईपुढे अक्षरशः लोटांगण घालत मतांची चादर पसरली हे वास्तव तरी सुजाण सर्वधर्म समभाव बाळगणाऱ्यांनी स्विकारल पाहिजे , भले मोदींची चारशे होता होता चांगलीच जिरली असेल त्यामुळे चंद्राबाबू नायडू काय किंवा पलटूराम नितिशकुमार यांचा फाफट पसारा भाजपला यापुढे सहन करताना नाकीनऊ येणार आहे पण या पलटूरामांनी फारच नको तितक्या कोलांट्या उड्या मारु नये नाहीतर जिथे आहे तिथून इतके घसरणीवर याल की त्याला मर्यादा असणार नाही .
चार जूनचा निकाल माझ्या अजूनही जळी स्थळी कास्टी लागून राहिल्याने तो काही केल्या कंठी उतरत नाही पण त्याला काय करणार कारण जे वास्तव आहे ते तर स्विकारण्याची अंतिम गरज आहे मग त्याला पर्याय तुमच्यासमोर नसतो ! मग काय मुग गिळून गप्प बसायचं बाकीचे काही नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपचे नेते कमालीचे हतबल झाले होते यात काही शंका नाही. कारण यांनी निवडणुकीत इतका सावळा गोंधळ घातला त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात सुध्दा कुणाला उमेदवारी मिळणार याचा थांगपत्ता नव्हता. मग जे व्हायचे ते होऊ भाजपला घसरगुंडीच्या झोपाळ्यावर झुलत राहावे लागले यापेक्षा वेगळी परिस्थिती भिंतीला चिकटून सरकत नव्हती .
जी स्थिती महाराष्ट्रात होती त्यापेक्षा वेगळी परिस्थिती उत्तर प्रदेशात नव्हती कारण त्या राज्याचे मानसन्मान असणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या ज्या उमेदवारांची निवड केली होती तिथे तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कात्री लावली त्यामुळे होत्याच नव्हतं झाल. पण त्याचा फटका भाजपला स्वपक्षीय बहुमत मिळताना बसलाना , मग याची जबाबदारी थोडीच अमित शहा घेणार आहेत का ॽ. यातून भाजपच अंतर्गत राजकारण चौपाटीवर आलं. कारण अमित शहा यांना योगींची राजकीय शक्ती दिल्लीत काही केल्या दाखवायची नाही कारण चायवाल्यानंतर देशातील लोकांना गायवाला योगीबाबा पाहिजे होते याची नस ओळखून अमितभाईंनी उत्तर प्रदेशातील लोकांची राजकीय भाषेत चक्क नसबंदी केली पण यामुळे भाजपला चंद्राबाबू नायडू किंवा पलटीराम नितिशकुमार यांचा वेळोवेळी होणारा हस्तक्षेप नाहक सहन करावा लागणार आहे. कारण यांचा राजकीय इतिहास बघता ते काही केल्या भाजपच सरकार पाच वर्षे पूर्ण करून देतील याची अजिबात खात्री नाही. परिणामी दोन वर्षात देशात मध्यावधी निवडणुका लागू शकतात असा माझा तर्कशुद्ध बुध्दीचा अंदाज आहे , पाहू.

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button