श्री दुर्गादेवी मंदिर, लोहार गल्ली येथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी

श्री दुर्गादेवी मंदिर, लोहार गल्ली येथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/01/2026 : श्री दुर्गादेवी मंदिर, लोहार गल्ली, सुतारनेट, अकलूज( तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. गत चौदा वर्षापासून श्री विश्वकर्मा जयंती येथे साजरी करण्यात येत आहे.
मंडळाचे अध्यक्ष यशवंत अर्जुन कळसाईत यांनी मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने श्री विश्वकर्मा जयंती सोहळ्याची जय्यत तयारी केली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष यशवंत अर्जुन कळसाईत यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे आणि जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान करण्यात आला. श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सायंकाळी श्री दुर्गा देवी मंदिर लोहार गल्ली सुतारनेट येथे महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती या प्रसंगी यशवंत कळसाईत यांनी दिली.
