मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/11/2025 : आपली पुढील पिढी घडवण्यासाठी आपण सतत दक्ष असणे आवश्यक आहे. आपला पाल्य किंवा आपला विद्यार्थी चांगला, संस्कारित घडवा म्हणून पालक व शिक्षकांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
आपल्या वर्तनातून मुले पाहून संस्कारित होतात. आपले चार अनुभवाचे बोल ऐकून ते सुधारतात. काही गोष्टी त्यांच्यावर बिंबवाव्या लागतात. जसे की व्यायामाचे महत्त्व, व्यसनांचे दुष्परिणाम, दूरदर्शन-मोबाईल यांचा गरजेपुरता वापर.
मुलांची टक्केवार महत्त्वाची असली तरी त्यांचे आरोग्य, त्यांचे विचार व वर्तन जास्त महत्वाचे आहेत. देश व देशवासींच्या बद्दल प्रेम असणाऱ्या जबाबदार नागरिकांची देशाला गरज आहे.
आजचा संकल्प
आपली मुले व्यवसायाने कोणीही होतील पण ती सुसंस्कारित नागरिक, माणसाला माणूस समजणारी माणसे होणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवू व त्यांना घडवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

