ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 06/11/2025 :
आपल्याला दैनंदिन जीवनात काही न काही अडचणी येतात. कधी आपले मित्र उपयोगी पडतात तर कधी सगळेच आपली गंमत पहात असतात. आपण एकटे पडलो याचे वाईट पण वाटते.
पालकांनी, मित्रांनी, शिक्षकांनी मदत करावी, मानसिक आधार द्यावा असे आपल्याला मनोमन वाटत असते. त्यांनी नुसती सहानुभूती न दाखवता आपल्याला आम्ही तुझ्याबरोबर आहोत असा धीर द्यावा व मदत करावी अशी आपली अपेक्षा असते.
पण खरे सांगू का मुलांनो, हिच वेळ योग्य असते स्वतःला सिद्ध करण्याची. शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेण्याची. कोणाच्या मदतीशिवाय त्यातून बाहेर पडण्याची.
कोणताही प्रसंग आला तरी इतरांना दोष देण्यापेक्षा सकारात्मक भावनेने विचार करा.
सौ. स्नेहलता स. जगताप.
======================

