मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 06/11/2025 :
हल्ली रक्ताच्या नात्याची संख्या कमी होत चालली आहे. एक किंवा दोन मुले असल्याने अनेक ठिकाणी सख्खा काका, मामा, मावशी, आत्या अशी नाती कमी झाली आहेत.
प्रत्येकजण व्यस्त असल्याने कोणाला कोणाकडे जायला किंवा कोणाशी बोलायला वेळच नाही. मनमोकळे बोलणे किंवा गप्पा मारणे दुर्मीळ झाले आहे. परिणामी आपली मने मोकळी होत नाहीत. प्रत्येकाला एक प्रकारचा मानसिक ताण असतो.
या परिस्थितीत आपण मैत्रीचे नाते जपले तर? प्रत्यक्ष नियमित भेटता आले नाही तरी समाजमाध्यमांच्या द्वारे भेटू शकतो, बोलू शकतो. घरांप्रमाणे मनाची दारे-खिडक्या पण उघडी ठेवली पाहिजेत. मनातील बोलू शकू अशी काही नाती जपली पाहिजेत.
आजचा संकल्प
आपल्याशी मनमोकळे बोलू शकतील, ताण कमी करू शकतील यासाठी आपण इतरांना वेळ देऊ. मी आहे असा पुरेसा विश्वास देऊ व नाती बळकट करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

