डॉ.हिमालय बाळकृष्ण घोरपडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर

डॉ.हिमालय बाळकृष्ण घोरपडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/11/2025 :
मळोली (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील डॉ. हिमालय बाळकृष्ण घोरपडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवून माळशिरस तालुक्याची तसेच सोलापूर जिल्ह्याचा मान उंचावली आहे. सध्या ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.घोरपडे हे मळोली गावचे रहिवासी असून त्यांचे वडील डॉ.बाळकृष्ण घोरपडे हे निवृत्त प्राध्यापक तर आई सुवर्णप्रभा घोरपडे या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत.
डाॅ.हिमालय यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथे तर १२वी चे शिक्षण विवेकानंद सायन्स कॉलेज, कोल्हापूर येथे झाले.त्यानंतर त्यांनी मुंबईतील नायर हॉस्पिटल सेंटर येथे एमबीबीएस पदवी प्राप्त केली. सन २०१९ साली त्यांनी प्रथमच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश संपादन करून तहसीलदार पद मिळवले.यशदा पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हिंगोली येथे पर्यवेक्षाधीन तहसीलदार म्हणून सेवा दिली. त्यानंतर २०२२ ते २०२४ या कालावधीत अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत राहून उल्लेखनीय प्रशासनिक कामगिरी बजावली.

