ताज्या घडामोडी

गुंतवणूक केली खड्ड्यात गेली योजना

गुंतवणूक केली खड्ड्यात गेली योजना

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 08/06/2024 :

१. नजिकच्या भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसे असतील पण प्यायला “पाणी” नसेल. आपण फार वेगाने ह्याकडे प्रवास करतो आहोत. कोकणासारख्या भरपूर पाऊस असलेल्या प्रदेशात देखील पाणी प्रश्न गंभीर होतो आहे. बोरवेल्स २०० फूट पेक्षा खाली जात आहेत. पहिल्या स्तरांवर १०० फूटाच्या आत मिळणारे भूजल संपत आले आहे. आणि सततची बांधकामे, रस्त्याची कामे ह्यामधे वापरले जाणारे सिमेंट, डांबर अशा गोष्टींमुळे जमीनी कडक झाल्या आहेत. ह्यामुळे पावसाळ्याचे पाणी रस्ते, गटारे, नाले ह्यावरून वहात जाऊन नदीला मिळते आणि समुद्राला. ह्याचा काहीही उपयोग नाही. कारण सारे पाणी वाहून जाते, कुठेही अडवले जात नाही. जर पाणी अडवले जात नाही तर ते जिरत नाही. अशाने भूजल परत रिचार्ज होत नाही. आपण अनेक पावसाळे असे फुकट घालवले आहेत, पण भूजल खणून खणून, शोषून शोषून वापरत आहोत.
२. ⁠पाणी जिरायला पाहिजे तर आधी ते अडवले जायला हवे आणि जमीनीचा वरचा स्तर जो कडक झालेला आहे तो फोडून त्याला जिरायला वाट दिली पाहिजे. सिमेंट, डांबरमुळे कडक झालेला हा स्तर काही फार नाही. फारतर एखाद दिड फूट आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात ठिकठिकाणी खड्डे खणले असता हे सोपे होऊ शकते. प्रत्येक खड्डा हा भूजल रिचार्ज करणारा चार्जींग पॉईंट होऊ शकतो. पण ह्यातील काही स्वयंप्रेरणेने वगैरे होणार नाही. आता करू, मग करू म्हणून आपण ते टाळत राहणार. ह्यासाठीच ही योजना आहे. आपल्यापैकी बऱ्याचा जणांची इच्छा तर असते पण प्रत्यक्ष सहभाग शक्य नसतो, अडचणी असतात. असे ह्या योजनेत सहज सहभागी होऊ शकतात.
३. पुढील आठवड्यात मी वाडी वरवडे ह्या माझा गावातील सरपंचांना भेटून एक पत्र देणार आहे आणि गावात एक मोठा बोर्ड लावणार आहे. भूजलाचे महत्व समजावून सांगणार आहे. आणि २ फूट खोल, २ फूट रूंदीचा खड्डा करणाऱ्याला ५०/- देणार आहे. १००० खड्डे अशा प्रकारे होई पर्यंत मी प्रती खड्डा ५०/- देणार आहे. हे माझे डोनेशन नाही. ही माझी गुंतवणूक आहे. ह्याचे उत्तम रिटर्न मला भावी काळात मिळणार ह्याची खात्री आहे. कदाचीत भविष्यात माझाकडे कोट्यावधी रुपये असतील पण प्यायला पाणी नसेल, त्यापेक्षा आज मी ५०००o गुंतवतो. आणि भविष्यात पाणी मिळत राहील ह्या बद्दल खात्री करतो! अशा स्वरूपाची ही योजना मी “गुंतवणूक केली खड्ड्यात गेली” ह्या नावाने सुरू करत आहे.
४. ⁠ ज्यांना सहभागी व्हायची आहे त्यांनी कृपया ह्या स्किमचा मेसेज स्वत:च्या नावाने प्रसारीत करा. कुणालाही मला, आषाढीला किंवा दुसऱ्या कुणाला पैसे द्यायचे नाहीत. नाव देखील घ्यायची गरज नाही. तुम्हाला जमतील तितक्या खड्ड्यांची जबाबदारी घ्या. ज्याने कुणी खड्डा खणला त्याला ५०/- द्या. जमतील तितके खड्डे खणून घ्या. १० – २० – १०० – १००० .. आपल्या सोसायटीला प्रवृत्त करा. आपल्या नगरसेवकाला भेटा. आपल्याला पाणी पुरवठा करणारी बोरवेल, विहीरी, तळी, बांधारे आणि सगळीकडे खड्डे खणा. पाण्याच्या स्त्रोतांजवळ खड्डे खणताना १० फूट लांबीवर खणा. ठिकठिकाणी पाणी जमीनीत जिरूदे. कोट्यावधी लिटर पाणी जिरवायचे आहे लक्षात घ्या. कराल तितके खड्डे कमी आहेत. गेल्या अनेक वर्षात जे पाणी आपण भूगर्भातून काढले आहे, त्याचा परतावा आपल्याला करायचा आहे. आणि ही गुंतवणूक आहे. आपल्याला परत अनेक वर्षे उपयोगी पडणार आहे.
५. ⁠पावसाळा अखेरीस ह्या खड्ड्यांमधे भरपूर मूळसांभार असलेले एक मोठे झाड आपल्याला लावायचे आहे. ज्यांना महावृक्ष म्हणतात अशी झाडे जसे की आंबा, फणस, वड, पिंपळ, औदुंबर, चिंच. ह्यांची मुळे जमीनीत खोलवर आणि दूरवर पसरत राहतात, जमीन भुसभुशीत ठेवतात आणि लाखो लिटर पाणी दरवर्षी जमीनीत मुरवत राहतात. हे वृक्ष भूजलाचे कायम स्वरूपी चार्जींग पॉईंट असतात.

हा मेसेज प्रचंड व्हायरल करायला मला मदत करा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचूया. लाखो खड्डे मारूया. कोट्यावधी लिटर पाणी मुरवूया. ही संधी परत ८ महिन्यांनी येणार हे विसरू नका. हा मॉन्सून खूप चांगला आहे, पुढचा कसा असेल माहित नाही.

चला खड्ड्यात पैसे घालूया!

लेखक- विनय सामंत
9820262692

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.