मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 04/12/2025 :
कळत नकळत कधी आपण तर कधी आपल्याकडून कोणी दुखावले जाते. अशा वेळेस ज्याच्यावर वेळ येते ती व्यक्ती खूप नाराज होते, खचून जाते. माझ्याच बाबतीत असे का? असा प्रश्न पडतो जो अनुत्तरित असतो.
अशा प्रसंगा नंतर कोणी समजुत घालावी, सॉरी म्हणावे असे मनातून वाटत असते. तसे झाले तर मन थोडे शांत होते पण तसे घडलेच नाही तर आपण मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत राहतो.
अशी वेळ आल्यावर आपण प्रत्येकाने स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर ठेवायचे. स्वतः सकारात्मक विचार करायचे. त्या व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे ते वागले. आपण मनाला लावून घ्यायचे नाही अशी स्वतःची समजूत घालायची. यामधून प्रसंगाची तीव्रता कमी होते.
आजचा संकल्प
एखाद्या कटू प्रसंगातही स्वतःला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी आपले संस्कार, आपली वैचारिक पातळी व आपली सकारात्मकता जागृत ठेवू व स्वतःचा मानसिक ताण कमी करू.
सौ. स्नेहलता स. जगताप

