ताज्या घडामोडी

आपण कंजूमर बनण्यापेक्षा मालक बनलं पाहिजे.

संपादकीय…………..✍️

आपण कंजूमर बनण्यापेक्षा मालक बनलं पाहिजे.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 08/06/2024 :

बचत करणे हे व्यक्तीसाठी नेहमी चांगले मानले जाते. पण सगळ्याच लोकांनी खूप बचत केली तर काय होईल? सरकारला आणि बाजाराला तुम्ही बचत करू नये असे का वाटते? कधी कधी गुंतवणुकीविषयी जेव्हा लोकांशी गप्पा होतात तेव्हा माझ्या बोलण्यात सहसा येते की “आपण कंजूमर बनण्यापेक्षा मालक बनलं पाहिजे”. शेअर्स हा सामान्य लोकांसाठी मालक बनण्याच्या सोपा मार्ग आहे. (पण सामान्य लोक शेअर्सचा वापर जुगार खेळण्यासाठी करतात. तो वेगळा विषय आहे. )
असं म्हटल्यावर बरेच जण म्हणतात की प्रत्येक जण मालक बनला तर कन्सुमर कोण बनेल आणि वस्तू विकत कोण घेईल? खरंतर त्यांना काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून ते असं म्हणत असतात किंवा आपण चंगळवादाला बळी पडलो आहोत असं मान्य करायचं नसतं. पण तरीही मी हा प्रश्न सिरियसली घेतो.
खरंच प्रत्येक जण गुंतवणूक किंवा बचत करत राहिला तर काय होईल?
तर वस्तू विकत घेण्याचे प्रमाण कमी होईल. आणि मग इकॉनोमिक ऍक्टिव्हिटी किंवा कंझप्शन कमी होईल, पर्यायाने सेविंग आणि गुंतवणुकीचे रिटर्न्स कमी होतील.
यालाच अर्थशास्त्रात The paradox of thrift (किंवा बचतीचा विरोधाभास) असे म्हणतात. बरं, असं खरंच होईल का?
मला तरी वाटतं की हा एक काल्पनिक गृहीतक आहे. वास्तवात असे होणार नाही. ते का होणार नाही, यासाठी अर्थशास्त्र किंवा गणितात कुठले स्पष्टीकरण नाही पण मानसशास्त्रात असू शकते.
इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हवा असलेला माईंडसेट आणि बिझनेस करण्यासाठी हवा असलेला माईंडसेट यामध्ये खूप साधर्म्य आहे.
बिझनेस म्हणजे काय? तर एखादी स्ट्रॅटेजी प्लॅन करणे आणि मग तिला एक्झिक्युट करणे. यात प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन या दोघांनाही समान महत्त्व आहे.
गुंतवणूक म्हणजे काय? तर बिजनेस वजा एक्झिक्युशन.
एखादी व्यक्ती जेव्हा सिरीयस गुंतवणूक करत असते त्यावेळी आणि बिझनेस मधल्या स्ट्रॅटेजी बनवतानाच्या वेळी म्हणजे दोन्ही वेळी मेंदू मधले एकाच प्रकारच्या ब्रेन सेल्स वापरल्या जातात. गुंतवणूक करणे प्रत्येकासाठी शक्य नाही. थोडक्यात गुंतवणूकदार किंवा बिझनेस स्ट्रॅटेजी करणारा आणि एक्झिक्युट करणारा हे लोक कायम अल्पसंख्याक असतात. थोडक्यात ते लीडर असतात. आणि लीडर कायम अल्पसंख्याक असतात. उद्या जर कोणी म्हटले की, “प्रत्येक जण बिजनेस करायला लागला तर विकत कोण घेणार?” हा प्रश्न जितका बाष्कळ आहे, तितकाच, “प्रत्येककजण गुंतवणूक करायला लागला किंवा मालक म्हणला तर वस्तू विकत कोण घेणार हा प्रश्न सुद्धा तितकाच अर्थहीन आहे.”
कित्येक शेअर्सच्या बाबतीत उदाहरणे दिली जातात. जसं 2006 ला आयशर मोटर्स बनवत असलेली एक लाखाची बुलेट गाडी म्हणजेच रॉयल इन्फिल्ड घ्यायच्या ऐवजी जर कोणी आयशर मोटर्स चा शेअर घेतला असता तर पुढच्या दहा वर्षात तो शेअर दीड कोटी पेक्षा अधिक मूल्याचा झाला असता पण गाडीचे मूल्य तितकेच किंवा त्याहूनही कमी झाले असते. असे खूप उदाहरणे शेअर मार्केटमध्ये सापडतील. मग कोणीतरी म्हणतो की प्रत्येकाने शेअरच घेतला आणि गाडी घेतली नाही तर शेअरची किंमत कशी वाढेल? या ठिकाणी ती व्यक्ती फक्त वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी उत्तर देत असते किंवा डिबेटमध्ये हार न मानण्यासाठी काहीतरी उत्तर देत असते. पण तरीसुद्धा ही शक्यता सुद्धा गृहीत धरली पाहिजे. आणि याचे उत्तर अर्थशास्त्रात The paradox of thrift (किंवा बचतीचा विरोधाभास) या तत्त्वात सापडते.
अशी वेळ कधी येणार नाही यासाठी बाजार सरकार आणि सगळी इकोसिस्टीम प्रयत्न करत असते. फार थोडे लोक असतात जे इन्व्हेस्टमेंट आणि सेविंग करत असतात. खरंतर इतर लोक जितकी जास्त चंगळवादाला बळी पडतील तितका जास्त फायदा गुंतवणूकदाराला असतो. त्यामुळे (खोचकपणे) असा प्रश्न विचारणाऱ्याला माझे हेच उत्तर असते की तू बुलेट घे मी आयशर मोटरचा शेअर घेतो. तू झुडीओमध्ये शॉपिंग कर मी टाटा ट्रेंट चा शेअर घेतो. तू तनिष्क मधून सोनं घे मी टायटनचा शेअर घेतो. अज्ञात लेखकास साभार!

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.